स्वराज ट्रॅक्टरने 25 लाख उत्पादनांचा टप्पा गाठला

मोहाली29 ऑगस्ट 2025:  महिंद्रा ग्रुपचा भाग असलेल्या आणि भारतातील आघाडीच्या ट्रॅक्टर ब्रँडपैकी एक असलेल्या स्वराज ट्रॅक्टरने आज पंजाबमधील मोहाली येथील त्यांच्या उत्पादन कारखान्यातून 25 लाख ट्रॅक्टरचे उत्पादन झाल्याची घोषणा केली. 2022 मध्ये स्वराजने 20 लाख उत्पादनाचा टप्पा गाठला होता. त्यानंतर अवघ्या तीन वर्षात कंपनीने हा महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. यामुळे स्वराज ट्रॅक्टर हा देशांतर्गत ट्रॅक्टर उद्योगातील सर्वात वेगाने वाढणारा ट्रॅक्टर ब्रँड असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

20-25 एचपी श्रेणीतील पहिले मॉडेल ‘स्वराज 724’ लाँच करत स्वराजचा प्रवास 1974 मध्ये सुरू झाला. या ट्रॅक्टरच्या माध्यमातून भारतातील पहिले स्वदेशी डिझाइन असलेले आणि स्वदेशात उत्पादित ट्रॅक्टर बनवले. हरित क्रांतीच्या काळात स्वावलंबनाच्या भावनेतून जन्मलेले ‘स्वराज’ हे नाव स्वातंत्र्य आणि स्वयंपूर्णतेच्या शक्तिशाली भावनेतून निर्माण झाले आहे. भारतीय अभियंत्यांनी भारतीय शेतीसाठी बनवलेला एक मजबूत, विश्वासार्ह आणि परवडणारा ट्रॅक्टर म्हणजे स्वराज. गेल्या काही दशकांपासून, स्वराज आपल्या मुळांशी प्रामाणिक आहेच पण बदलत्या काळानुसार ग्राहकांच्या बदललेल्या गरजांचा विचार करत  ट्रॅक्टर आणि शेती यांत्रिकीकरणात सातत्याने बदल केले जात आहेत. परिणामी शेतकऱ्यांचे या ब्रँडसोबत असलेले नाते अधिक घट्ट होते आहे.

2002 मध्ये 5 लाख उत्पादनाचा टप्पा गाठल्यानंतर, केवळ 23 वर्षांत स्वराजने उत्पादनात पाच पट वाढ करून ते 25 लाख युनिट्सपर्यंत नेले आहे. भारतीय शेतीमधील स्वराजच्या मजबूत उपस्थितीचे हे द्योतक आहे.

स्वराज पोर्टफोलिओमधील ट्रॅक्टर असे आहेत, जे साधेपणा आणि अत्याधुनिकतेसह उत्कृष्ट निकाल देते. या श्रेणीमध्ये स्वराज 855, 735, 744, 960, 742, 963, स्वराज टार्गेट आणि अलीकडेच लाँच झालेल्या नया स्वराज श्रेणीसारखे प्रतिष्ठित मॉडेल समाविष्ट आहेत. नव्याने विकसित होणारी क्षेत्रे तसेच हलक्या वजनाच्या शेती उपायांना पूर्ण करण्याची ब्रँडची क्षमता यातून समोर येते.

या महत्त्वाच्या टप्प्याबद्दल एम अँड एम लिमिटेडच्या फार्म इक्विपमेंट बिझनेसचे अध्यक्ष श्री. विजय नाक्रा म्हणाले, “स्वराजने गाठलेला 25 लाख उत्पादन टप्पा म्हणजे शेतकऱ्यांच्या पिढ्यांनी या ब्रँडवर ठेवलेल्या विश्वासाचे प्रतिबिंब आहे. भारताच्या स्वावलंबन आणि स्वयंपूर्णतेच्या भावनेतून जन्मलेला स्वराज शेतकऱ्यांना तर सक्षम करत आहेच पण शेतीत परिवर्तन घडवून आणण्याच्या आमची वचनबद्धता अधिक दृढ करतो आहे.”

एम अँड एम लिमिटेडच्या स्वराज विभागाचे सीईओ श्री. गगनजोत सिंग म्हणाले, “ट्रॅक्टर हे आमच्यासाठी फक्त एक मशीन नाही, तर तो शेतकऱ्यांच्या प्रगतीतील भागीदार आहे. जो कमी ऑपरेटिंग खर्चामध्ये विश्वासार्ह कामगिरी करतो आणि त्यांच्या गरजांवरील एक महत्त्वाचा उपाय आहे. शेतकरी समाजाच्या आकांक्षा, आव्हाने आणि जीवनशैली समजून घेतल्याने आमचे त्यांच्याशी घट्ट नाते जोडले गेले आहे. 25 लाखांचा टप्पा गाठणे हा आमच्या संपूर्ण टीमसाठी अभिमानाचा क्षण आहे. आणि भारतीय शेतकऱ्यांना त्यांच्या समृद्धीच्या प्रवासात अधिक भक्कमपणे पाठिंबा देण्यासाठी प्रेरणा आहे.”

एखाद्या शेतकऱ्याने आपला पहिला ट्रॅक्टर खरेदी केल्याचा अभिमान ते पालकांकडून मुलांपर्यंत पोहोचणारा पिढ्यांचा विश्वास यापर्यंत, स्वराज हा ग्रामीण भारताच्या रचनेत पूर्णपणे सामावलेला आहे. स्वराज ट्रॅक्टर श्रेणी विविध भूप्रदेशांमध्ये विश्वासार्ह कामगिरी करते, त्याचे योग्य मूल्य देते, ज्यामुळे ते भारतातील शेतीचा अविभाज्य भाग बनले आहे.