वी ने पुण्यात ५जी सेवांचा शुभारंभ केला

देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी, वी उद्यापासून पुण्यामध्ये ५जी सेवा सुरु करत आहे. गेल्या महिन्यात वी ने नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथे आपल्या ५जी सेवा सुरु केल्या. वी च्या अत्याधुनिक कनेक्टिविटीचा अनुभव आता पुणेकरांना देखील घेता येणार आहे. वी ने भारतामध्ये आपल्या ५जी नेटवर्कची सुरुवात मुंबईपासून मार्च २०२५ मध्ये केली. आता पुणे हे वी ची ५जी कनेक्टिविटी असलेले महाराष्ट्रातील पाचवे शहर आहे. वी ला जिथे ५जी स्पेक्ट्रम मिळाले आहे त्या १७ प्रायॉरिटी सर्कल्समधील २३ शहरांमध्ये ५जी विस्तार करण्याचे काम सध्या वेगाने सुरु आहे, त्याचाच हा एक भाग आहे.

पुणे शहराच्या आधी वी ने आपल्या ५जी सेवा मुंबई, दिल्ली-एनसीआर, बंगलोर, म्हैसूर, नागपूर, चंदिगढ, पटना, जयपूर, सोनिपत, अहमदाबाद, राजकोट, सुरत, वडोदरा, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, मेरठ, मलप्पुरम, कोझिकोडे, विशाखापट्टणम, मदुराई, आग्रा, कोची आणि थिरुवनंतपूरममध्ये सुरु केल्या आहेत.

ज्यांच्याकडे ५जी-सक्षम डिव्हायसेस आहेत असे पुण्यातील वी युजर्स उद्यापासून वी ५जी सेवा वापरू शकतील. शुभारंभाच्या निमित्ताने वी आपल्या युजर्सना २९९ रुपयांपासून पुढील किमतीच्या प्लॅन्सवर अनलिमिटेड ५जी डेटा पुरवत आहे. हाय-डेफिनिशन स्ट्रीमिंग, गेमिंग, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, अधिक वेगवान डाउनलोड आणि रिअल-टाईम क्लाऊड ऍक्सेस यांचा आनंद वी ग्राहक घेऊ शकतील.

वोडाफोन आयडियाचे ऑपरेशन्स डायरेक्टर, श्री रोहित टंडन यांनी सांगितले, पुण्यामध्ये वी ५जी सुरु करत असताना, आम्ही दक्खनच्या राणीला कनेक्टिविटीच्या भविष्याचे लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आमचे अत्याधुनिक ५जी आणि सर्वत्र पसरलेल्या ४जी सेवा यांच्यासह आमच्या युजर्सना अधिक जास्त पर्याय प्रगत अनुभव मिळवून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. वाढत्या मागण्या आणि ५जी हॅन्डसेट्सचा वाढता वापर यांना अनुसरून, आमच्या ५जी सेवा अतिशय पद्धतशीरपणे संपूर्ण महाराष्ट्रभर पसरवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.”

 महाराष्ट्रामध्ये सर्वोत्कृष्ट ५जी अनुभव मिळवून देण्यासाठी वी ने एरिक्सनसोबत हातमिळवणी करून, प्रगत, ऊर्जा बचत सक्षम पायाभूत सोयीसुविधा तैनात केल्या आहेत व नेटवर्क कामगिरी स्वयंचलित पद्धतीने ऑप्टिमाइज करण्यासाठी एआय-सक्षम सेल्फ-ऑर्गनायजिंग नेटवर्क्स कार्यान्वित केली आहेत.

५जी सेवा सुरु करण्याबरोबरीनेच, वी ने महाराष्ट्र आणि गोवा सर्कलमध्ये त्यांचे ४जी नेटवर्क देखील लक्षणीयरीत्या अपग्रेड केले आहे. त्यामुळे वाढलेले कव्हरेज, जलद डेटा स्पीड आणि एकूणच उत्कृष्ट युजर अनुभव मिळेल. मार्च २०२४ पासून, त्यांनी ७,९०० हून अधिक साइट्सवर ९०० मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम यशस्वीरित्या तैनात केले आहे, त्यामुळे इनडोअर कव्हरेज मजबूत झाले आहे. ७,००० हून अधिक साइट्सवर २१०० मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम क्षमता वाढेल. याव्यतिरिक्त, २२०० शहरांमध्ये २१०० हून अधिक नवीन साइट्स जोडल्या गेल्या आहेत. हे अपग्रेड शहरी आणि ग्रामीण भागात सातत्यपूर्ण आणि उच्च-गुणवत्तेची कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याच्या वी च्या वचनबद्धतेवर भर देतात.

ग्राहक आणि व्यवसायांच्या विकसित होत असलेल्या डिजिटल गरजा पूर्ण करणारे भविष्यासाठी तयार नेटवर्क तयार करण्यासाठी वी वचनबद्ध आहे. उपलब्धता, किंमत आणि पूरक डिव्हाइसेसबद्दल अधिक माहितीसाठी, https://www.myvi.in/5g-network ला भेट द्या.