स्विफ्टएनलिफ्ट मीडियातर्फे पुण्यातील उद्योजकांचा गौरव

पुणे (दै. आरंभ पर्व) : देशातील नवउद्योग, स्टार्टअप्स आणि व्यावसायिक उत्कृष्टतेचा उत्सव ठरलेला “भारत उद्योग सन्मान पुरस्कार आणि व्यवसाय परिषद २०२५” सोहळा पुण्यातील लेमन ट्री हॉटेलमध्ये मोठ्या थाटात पार पडला. स्विफ्टएनलिफ्ट मीडिया ग्रुपच्या पुढाकाराने व 6 हाऊसबुकच्या प्रायोजकत्वाखाली आयोजित या भव्य कार्यक्रमात विविध उद्योगांतील प्रेरणादायी व्यक्तींना सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाला अनेक दिग्गज मान्यवरांनी उपस्थिती लावून चारचाँद लावले. प्रमुख पाहुणे म्हणून येवळे ग्रुपचे एमडी आणि सीईओ श्री नवनाथ येवळे, प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि यशस्वी उद्योजिका श्रीमती सोनाली कुलकर्णी, तसेच वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विश्वजीत काइंगडे यांनी विशेष उपस्थिती दर्शवली.

स्विफ्टएनलिफ्टचे संस्थापक श्री निलेश साबे यांनी या उपक्रमाचे संकल्पनात्मक नेतृत्व करताना, भारतीय उद्योग क्षेत्रातील नाविन्यपूर्ण विचारांना आणि उद्योजकतेच्या नव्या लाटेला व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं की, “भारतातील तरुणांच्या कल्पकतेला योग्य दिशा आणि संधी मिळाल्यास, देश केवळ आत्मनिर्भर नव्हे तर जागतिक नेतृत्वाची वाटही चालू शकतो.”

कार्यक्रमात देशभरातून निवडक उद्योजकांना विविध श्रेणींमध्ये पुरस्कार देण्यात आले — स्टार्टअप्स, महिला उद्योजिका, टेक्नॉलॉजी इनोव्हेशन, सामाजिक उद्योजकता, ग्राहक सेवा अशा अनेक विभागांत देशातील कामगिरीदार व्यक्तींना गौरवण्यात आले. हा सन्मान त्यांच्या उत्कृष्ट कार्यक्षमतेचा आणि सामाजिक जबाबदारीचा कृतज्ञतेने घेतलेला नमस्कार होता.

श्रीमती सोनाली कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात नमूद केलं, “आजच्या काळात महिलांनी उद्योग क्षेत्रात भक्कम उभं राहत आपल्या कर्तृत्वाने समाजाला प्रेरणा दिली आहे. अशा स्त्रियांना या व्यासपीठावर सन्मानित करणं हे कौतुकास्पद आहे.”

वारजेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. काइंगडे यांनी उद्योजकतेसोबत सामाजिक उत्तरदायित्वाचं महत्त्व अधोरेखित करत, तरुणांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवत समाजासाठी कार्य करावं असं मत मांडलं.

हा उपक्रम केवळ पुरस्कार वाटपापुरता मर्यादित नसून, नवउद्योजकतेला चालना देण्याचा, नवकल्पनांना प्रोत्साहन देण्याचा आणि देशाच्या उद्योगविश्वात सकारात्मक उर्जा निर्माण करण्याचा एक प्रेरणादायी प्रयत्न आहे.

उद्योग-प्रेरणेच्या नव्या पर्वाची सुरुवात करणारा हा सोहळा यशस्वी ठरवणाऱ्या सर्व उद्योजक, आयोजक व सहभागींचे स्विफ्टएनलिफ्ट परिवाराने आभार मानले.

‘ही’ आहेत पुरस्कार विजेत्यांची नावे

· 1. श्री ओंकार भोसले – 6 Housebook
· 2. श्रीमती सुरेखा सावंत मते – दैनिक आरंभपर्व
· 3. श्री बाळाजी व्ही. कदम – Vyankyaafoods
· 4. श्री निखिल ताडे & श्री रविंद्र जोंधळे – Protecto Metal Finisher’s
· 5. श्री संदीप इस्व्हर पवार – Aaishwar Agro Flowra and Renewable Energy Service
· 6. श्री राकेश सुहास मुंडळे & श्री रोशन सुहास मुंडळे – Mundale Brother and Associates Ltd.
· 7. श्री शैलेन्द्र शिवाजी सुर्यवंशी – Plotson
· 8. श्री रवि नाईक – RTEX ELECTRONICS
· 9. श्री गोपाल खांडारे & श्रीमती प्राची खांडारे – Swaraj College
· 10. श्री मनीष एम. पुल्लरवार – Winwin Innfra and Agro Pvt. Ltd.
· 11. श्री सुधीर गोपालराव चौधरी – Genius Learning Program Pvt. Ltd.
· 12. Sarvadnya Solar Innovation & Global Services Pvt. Ltd.
· 13. श्रीमती श्रद्दा गांधी जैन – MY SPACE Interior Design Studio
· 14. श्रीमती स्मिता गणेश देशमुख – न मती संस्था महाराष्ट्र
· 15. श्री अविनाश रामदास फराणे – Sada Vijay Tour & Travels
· 16. श्री सुमित भारत गवळी – Swastik Dairy Farm and Seeds
· 17. श्री महेश गोविंद खाडके – Ratnadeep Tent House
· 18. श्रीमती साना सय्यद – Gys Beauty Salon and Academy
· 19. डॉ. सचिन अरुण ठनकार – Amrutvahini College of Engineering
· 20. श्रीमती रतान गणेश जळताप – नवयुग वेलफेअर सोशल फाउंडेशन
· 21. श्री महादेव श्रीपती भुरुगडे – Prithvi Industries
· 22. श्री दीपक श्रीकृष्ण कपूर – Anjali Enterprises
· 23. श्री विजय गजानन थोराट – Nature Earth Resort
· 24. श्री योगेश कान्तिलाल शाह – Mahaveer Automobiles
· 25. श्री राहुल रमेशभाई गांधी – Diya Publicity
· 26. श्रीमती काजल मरुती गेजगे – Kinjal Herbal Group
· 27. श्री प्रज्योत शिंदे – SP SKILLS RESOURCES LLP
· 28. श्री कोंडिबा इंगुळे – कृषिरत्न
· 29. श्री सुंजॉय चौधरी – Setup Mastery
· 30. सुश्री मंजुलिका गुरव – Agenome Research
· 31. डॉ. अमर पाटील – Samarth Group
· 32. श्री संकेत माधव भोसले – BHOSALE PATTERN WORKS
· 33. श्रीमती दीपाली सुरेश पाटील – Lilashwini Traders
· 34. श्री राजाराम रामचंद्र देवकाते – R R Agriculture Works
· 35. श्रीमती विभा सुभाष तावरे – G.K.S. Creations
· 36. श्री तुषार भीमराव बोंबळे – Aarambh Ventures Pvt. Ltd.
· 37. श्रीमती तेजश्री दत्ता वैद्य – Adira Boutique
· 38. श्री नरेंद्र गंगाधर खांडेकर – Narendra Fabrication & Engineering Works
· 39. श्री वासुदेव मोहन देवकर – VASUDEV ENGINEERING & FABRICATION
· 40. श्री. सचिन रमेशराव पाटील – Skon Communication Pvt. Ltd.
· 41. श्री अजय किसनराव महाजन – K-MINDZ EDUCATION
· 42. श्री राहुल जगन्नाथ कदम – 7 Fins Ventures
· 43. श्री अक्षय रवींद्र गायकवाड – BlueMarble Talent Pvt. Ltd.
· 44. श्री वैभव ज्ञानेश्वर सुतार – SHREE SAMARTH JCB SERVICES
· 45. श्री अक्षय मधुकर सुतार – SHREE SAMARTH INDUSTRIAL & ENGINEERING WORKS
· 46. श्री चैतन्य गजानन शिंदे – SHINDE GROUP OF BUSINESS
· 47. श्री प्रणव नीलेश साळुंके – MULTYFAB & ENGINEERING SERVICES
· 48. श्री राहुल भारत वाघमारे – RAMRAI ENGINEERING
· 49. श्री विशाल रामभाऊ लवटे – LAVTE CONSTRUCTION & REAL ESTATE
· 50. श्री सागर ज्ञानेश्वर वाव्हळे – VAWALE CONSTRUCTION AND INFRA PRIVATE LIMITED