१२ ऑगस्ट रोजी Vivo V60 स्मार्टफोनचा लॉन्च; Vivo S30 चा रिब्रँडेड व्हर्जन असण्याची शक्यता, किंमत ₹35,000 पासून सुरू होण्याची शक्यता

(प्रतिनिधी मानस मते): चिनी टेक्नॉलॉजी कंपनी Vivo लवकरच भारतात त्यांच्या V-सीरीजमधील एक नवीन ५जी स्मार्टफोन Vivo V60 लॉन्च करणार आहे. कंपनीने त्यांच्या अधिकृत वेबसाइट आणि ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरून टीझर शेअर करत १२ ऑगस्ट ही लॉन्च तारीख जाहीर केली आहे.

सध्यातरी कंपनीने फक्त लॉन्च तारीखच स्पष्ट केली असून, डिव्हाइसचे स्पेसिफिकेशन अधिकृतपणे जाहीर केलेले नाहीत. मात्र, टेक विश्लेषकांच्या मते, Vivo V60 हा चीनमध्ये अलीकडेच लाँच झालेल्या Vivo S30 स्मार्टफोनचा रिब्रँडेड व्हर्जन असू शकतो, कारण टीझरमध्ये दिसणारी डिझाइन S30 प्रमाणेच आहे. भारतात याची प्रारंभिक किंमत सुमारे ₹35,000 इतकी असण्याची शक्यता आहे.

अंदाजे स्पेसिफिकेशन्स:

🔹 डिस्प्ले:
Vivo V60 5G मध्ये 6.67-इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळू शकतो, जो 120Hz रिफ्रेश रेट, 1260 x 2800 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 5000 निट्स पीक ब्राइटनेस सपोर्ट करतो.

🔹 कॅमेरा सेटअप:
हा फोन 50MP मुख्य कॅमेरा, 50MP पेरिस्कोप लेन्स (3x ऑप्टिकल झूमसह) आणि 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा सह येऊ शकतो.
सेल्फीसाठी, 50MP फ्रंट कॅमेरा देण्यात येण्याची शक्यता आहे.

🔹 प्रोसेसर आणि सॉफ्टवेअर:
V60 मध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 4 किंवा Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन Android 16 OS वर चालेल.

🔹 बॅटरी आणि चार्जिंग:
फोनमध्ये 6,500mAh क्षमतेची बॅटरी आणि 90W फास्ट चार्जिंग सपोर्ट असू शकतो. काही रिपोर्टनुसार, 100W चार्जिंग सपोर्ट मिळण्याचीही शक्यता आहे.

🔹 रॅम आणि स्टोरेज:
हा डिव्हाइस 8GB व 12GB रॅम पर्यायात आणि 256GB व 512GB स्टोरेज पर्यायात उपलब्ध असू शकतो. शिवाय, व्हर्च्युअल रॅम सुविधाही मिळू शकते.

संपूर्ण तपशील लाँचिंग दिवशी समोर येतील, पण V60 स्मार्टफोन मध्यम बजेटमधील एक दमदार पर्याय ठरू शकतो, अशी अपेक्षा आहे.