Pune Rain Big News : पुण्यात पावसामुळे झाड कोसळले; डोक्यावर फांदी पडून तरुणाचा जागीच मृत्यू

By: Editor_Pratik

On: Monday, May 26, 2025 5:52 PM

Google News
Follow Us

Pune Rain Big News : शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, विविध भागांत पाणी तुंबणे, वाहतूक कोंडी आणि झाडे कोसळण्याच्या घटना घडत आहेत. अशाच एका घटनेत कर्वेनगर परिसरात झाडाची फांदी डोक्यावर कोसळल्यामुळे राहुल जोशी (वय अंदाजे ३०) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

ही दुर्घटना समर्थ पथाजवळ घडली असून, राहुल जोशी हे सिंहगड रस्त्याच्या दिशेने दुचाकीवरून जात असताना अचानक झाडाची मोठी फांदी त्यांच्या डोक्यावर कोसळली, त्यामुळे गंभीर दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाला. नागरिकांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावली होती, मात्र त्यापूर्वीच राहुल यांचा मृत्यू झाला होता.

अलंकार पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्घटना घडली असून, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. झाड कुजलेले होते आणि जोरदार पावसामुळे ते कोसळल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे.

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. पावसाळ्यापूर्वी महापालिकेने झाडांची छाटणी, खड्डे बुजवणे, गटार आणि नाल्यांची स्वच्छता यांसारखी कामे न केल्यामुळे अशा दुर्घटना घडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. संभाव्य धोका असलेली झाडे हटवण्यात महापालिकेने हलगर्जीपणा केल्याने एका निष्पाप तरुणाचा बळी गेला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, मान्सूनने यंदा १२ दिवस आधीच महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. पुणे, मुंबई, कोकण, सोलापूरसह राज्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी पुढील चार दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

OPPO India

April 27, 2026

OPPO India

April 27, 2026

April 27, 2026

April 27, 2026

Sbi एसबीआय

April 25, 2026

April 24, 2026