मुंबई, ऑक्टोबर २०२६ : भारतातील सर्वात मोठी स्मॉल फायनान्स बँक असलेल्या एयू स्मॉल फायनान्स बँकेने ‘एयू हार्ट टू कार्ट शॉपिंग फेस्टिव्हल २०२६’ हा आपला प्रमुख उपक्रम आठव्यांदा आयोजित केला आहे. हा फेस्टिव्हल ११ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर २०२६ या काळात सुरू राहणार आहे. नवरात्र आणि दसऱ्यापासून दिवाळीपर्यंतच्या सणासुदीच्या काळात हा महिनाभराचा फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे. या काळात ग्राहक मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. एयूच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डांद्वारे, एयू ०१०१ मोबाइल ॲपमधील यूपीआय पेमेंटद्वारे तसेच बँकिंग सेवा, कर्ज योजना आणि व्यापाऱ्यांसाठीच्या पेमेंट सुविधांद्वारे ग्राहकांना बचतीचा आणि विविध बक्षिसांचा लाभ घेता येणार आहे.
‘सणासुदीच्या काळात इतक्या चांगल्या ऑफर्स असताना, खरेदी करण्यापासून थांबण्याचे कारणच नाही’ या संकल्पनेवर आधारलेल्या ‘एयू हार्ट टू कार्ट शॉपिंग फेस्टिव्हल २०२६’मध्ये दैनंदिन गरजा आणि सणासुदीच्या खरेदीसाठी विविध प्रकारच्या वस्तूंवर व सेवांवर ऑफर्स दिल्या जाणार आहेत.
एयू क्रेडिट किंवा डेबिट कार्डधारकांना पुढील क्षेत्रांमध्ये विविध ऑफर्सचा लाभ घेता येईल.
- प्रवास : यात्रा, मेकमायट्रिप, इक्सिगो, पेटीएम फ्लाइट्स आणि ईझीमायट्रिप यांच्याद्वारे १०,००० रुपयांपर्यंत बचत.
- इलेक्ट्रॉनिक्स : क्रोमा, रिलायन्स डिजिटल आणि विजय सेल्स येथे ७,५०० रुपयांपर्यंत बचत.
- मनोरंजन : बुकमायशो, पीव्हीआर आयनॉक्स आणि डिस्ट्रिक्ट बाय झोमॅटो यांच्या माध्यमातून ३,००० रुपयांपर्यंतची बचत.
- खाद्यपदार्थ आणि रेस्टॉरंट्स : ईझीडायनर, स्विगी आणि झोमॅटो यांच्या माध्यमातून ५०० रुपयांपर्यंत बचत.
- किराणा आणि झटपट डिलिव्हरी सेवा : झेप्टो, बिगबास्केट आणि ब्लिंकिट यांच्याद्वारे १,००० रुपयांपर्यंत बचत.
याशिवाय, या फेस्टिव्हलमध्ये सहभागी असलेल्या इतर ब्रँड्सवर आणि विविध श्रेणींतील वस्तू व सेवांवरही अनेक फायदे मिळतील.
खरेदीचा आनंद अधिक, बचतीचा लाभही अधिक
एयू स्मॉल फायनान्स बँकेने ३५ लक्झरी आणि प्रीमियम ब्रँड्ससोबत भागीदारी केली आहे. या ब्रँड्सच्या सहभागी विक्री केंद्रांमध्ये एयू क्रेडिट आणि डेबिट कार्डधारकांना खरेदीवर १० टक्के सवलत तात्काळ मिळेल. ही सवलत प्रत्येक ब्रँडसाठी जास्तीत जास्त २,५०० रुपयांपर्यंत असेल. यासाठी संबंधित अटी लागू असतील. या भागीदारांमध्ये जॉर्जिओ अरमानी, एम्पोरिओ अरमानी, अरमानी एक्सचेंज, बोटेगा वेनेटा, कोच, फेरागामो, ह्यूगो बॉस, जिमी चू, मायकेल कॉर्स, टॉड्स, टोरी बर्च आणि टुमी यांसारख्या ब्रँड्सचा समावेश आहे.
एयू ०१०१ मोबाइल ॲपद्वारे बक्षिसे आणि बचत
ग्राहक एयू ०१०१ ॲपद्वारे यूपीआय व्यवहार, बिलांचा भरणा, मोबाइलचे रिचार्ज, प्रवासाचे बुकिंग, गिफ्ट कार्ड्स आणि वनट्रॅक यांसारख्या सुविधांचा वापर करून बचत करू शकतात आणि बक्षिसेही मिळवू शकतात. स्विगी आणि झेप्टो यांसारख्या ब्रँड्सकडूनही त्यांना निवडक लाभ मिळतील. एयू ०१०१ ॲपद्वारे सर्वाधिक यूपीआय व्यवहार करणाऱ्या ग्राहकाला जोडप्यासाठी गोव्याच्या सहलीचे विनामूल्य बक्षीस मिळू शकते. यासाठी संबंधित अटी लागू असतील.
खरेदीपलीकडेही अनेक फायदे
मोठी खरेदी करण्याचे किंवा आर्थिक जबाबदाऱ्या स्वीकारण्याचे नियोजन करणाऱ्या ग्राहकांनाही या फेस्टिव्हलचा लाभ घेता येईल. गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, सोने तारण कर्ज आणि मालमत्तेच्या तारणावर मिळणारे कर्ज यांसाठी पात्र असणाऱ्या ग्राहकांना विविध फायदे मिळतील.
व्यावसायिक ग्राहकांसाठी एयू स्मॉल फायनान्स बँकेने एयू क्यूआर, साउंडबॉक्स आणि पीओएस सुविधांवरही विविध लाभ दिले आहेत. एयू क्यूआरद्वारे सर्वाधिक रक्कम जमा करणाऱ्या आघाडीच्या ग्राहकांना विनामूल्य सहलीचे बक्षीस मिळू शकते.
सणासुदीच्या काळातील सर्व ऑफर्ससाठी पात्रतेचे निकष, व्यवहारांची किमान मर्यादा, वैधता आणि इतर अटी लागू असतील. या ऑफर्सची सविस्तर माहिती एयू ऑफर्सच्या वेबसाइटवर, एयू ०१०१ ॲपवर आणि बँकेच्या शाखांमध्ये उपलब्ध आहे.
एयू स्मॉल फायनान्स बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी योगेश जैन म्हणाले, “एयू स्मॉल फायनान्स बँकेत आम्ही वर्षभर ग्राहकांना अधिकाधिक लाभ देण्याचा प्रयत्न करतो. सणासुदीच्या काळात प्रत्येक कुटुंब आपापल्या पद्धतीने आनंद साजरा करते. या काळात दैनंदिन गरजा, खरेदी, प्रवास आणि भेटवस्तू यांवरील बचतीसोबतच काही खास अनुभव घेण्याची संधी देऊन आम्ही ग्राहकांचा हा आनंद अधिक वाढवण्याचा प्रयत्न करतो. विविध ब्रँड्स, वस्तू व सेवांच्या श्रेणी आणि अनेक फायदे एकाच ठिकाणी उपलब्ध करून देऊन सर्व स्तरांतील ग्राहकांना त्यांच्या गरजांनुसार खरेदीचा अधिक चांगला अनुभव देणे, हे आमचे उद्दिष्ट आहे.
‘एयू हार्ट टू कार्ट शॉपिंग फेस्टिव्हल २०२६’ची आठवी आवृत्ती याच विचारातून साकारली आहे. दैनंदिन पेमेंट आणि यूपीआय व्यवहारांपासून ते प्रवास, खरेदी आणि प्रीमियम वस्तूंच्या खरेदीपर्यंत अनेक पर्यायांतून ग्राहकांना अधिक लाभ मिळतील. आमचे उद्दिष्ट सोपे आहे. ग्राहकांना सणासुदीच्या काळाचा पुरेपूर आनंद घेता यावा आणि आपल्या प्रियजनांसोबतचे क्षण अधिक आनंददायी व्हावेत, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”





