Vivek Bindra : स्वत:ला मोटिव्हेशनल स्पीकर म्हणणाऱ्या विवेक बिंद्रावर पत्नीला मारहाण केल्याचा आरोप : कानाचा पडदा फाटला, पहिल्या पत्नीविरुद्धही खटला प्रलंबित

इंटरनॅशनल मोटिव्हेशनल स्पीकर विवेक बिंद्रावर (Vivek Bindra) त्याच्या दुसऱ्या पत्नीवर हल्ला केल्याचा आरोप आहे. बिंद्राविरोधात नोएडामध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार विवेकने खोलीला कुलूप लावून पत्नीला बेदम मारहाण केली. त्यामुळे तिच्या कानाचा पडदा फाटला. बिंद्राने शिवीगाळ करत पत्नीचा मोबाइलही फोडला. बिंद्राविरोधात नोएडामध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Corona Update : देशात गेल्या २४ तासात ‘इतक्या’ जणांना कोरोना, चौघांचा मृत्यू; जेएन.1 व्हेरियंटचे 23 रुग्ण

एफआयआरनुसार, विवेक बिंद्राचा यानिकाशी ६ डिसेंबर रोजी विवाह झाला होता. 8 डिसेंबर रोजी मारहाणीची घटना घडली होती. यानंतर यानिकाला दिल्लीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानिकाचा भाऊ वैभव क्वात्रा याने 14 डिसेंबर रोजी सेक्टर-126 पोलिस ठाण्यात विवेकविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Top Trending Searches in India 2023 : यावर्षी भारतीयांनी गुगलवर मोठ्या प्रमाणावर सर्च केले ‘हे’ विषय; वाचा संपूर्ण यादी

मात्र, शुक्रवारी सायंकाळी ही बाब उघडकीस आली. विवेक बिंद्राचा एक व्हिडिओही समोर आला आहे. यामध्ये तो सोसायटीच्या गेटवर पत्नीशी वाद घालताना दिसत आहे. विवेक बिंद्रा हे बडा बिझनेसचे सीईओ आहेत. विवेकचे यूट्यूबवर २ कोटींहून अधिक सब्सक्राइबर आहेत.

Viral Video : लग्नात पनीरवरून राडा, एकमेकांच्या अंगावर फेकल्या खुर्च्या, भर मंडपात…

गाझियाबादमधील चंदर नगर येथील रहिवासी वैभव क्वात्रा यांनी एफआयआर दाखल केला आहे. वैभव हा विवेक बिंद्राचा मेहुणा आहे. यात त्याने सांगितले की, माझी बहीण यानिकाचा विवाह विवेक बिंद्रासोबत 6 डिसेंबर रोजी ललित मानगर हॉटेलमध्ये झाला होता. विवेक सध्या सुपरनोव्हा वेस्ट रेसिडेन्सी, सेक्टर-९४ मध्ये राहतो. 8 डिसेंबर रोजी पहाटे 3 वाजता विवेकचा आई प्रभासोबत वाद होत होता. यानिकाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता विवेकला पत्नीचा राग आला.

एफआयआरनुसार, “यानंतर विवेकने खोलीला कुलूप लावले आणि यानिकाला शिवीगाळ केली आणि मारहाण केली. तिचा मोबाइल फोन तोडला, तिचे केस ओढले. बहिणीच्या शरीरावर जखमा आहेत. तिला कानातही ऐकू येत नाही. तिच्या डोक्यावर एक जखम आहे. यामुळे बहिणीलाही चक्कर येत आहे. तिला उपचारासाठी दिल्लीतील करकडुमा येथील कैलाश दीपक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.”

यानिकाने आपल्या बहिणीला फोन करून लग्नानंतर घडलेल्या घटनेची माहिती दिल्याचे भाऊ वैभवने सांगितले. त्यानंतर मी बहिणीसोबत यानिकाच्या घरी पोहोचलो. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. बहिणीवर अनेक दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते. मारहाणीनंतर बहीण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तुटलेली आहे. ती कोणाशी जास्त बोलत नाही.

यानिका ही विवेक बिंद्राची दुसरी पत्नी आहे. बिंद्राच्या पहिल्या पत्नीचे नाव गीतिका सबरवाल आहे. बिंद्राचा त्याच्या पहिल्या पत्नीसोबत वाद सुरू आहे. दोघांचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. फरिदाबाद येथील ओमॅक्स हाईट्स सोसायटीमध्ये राहणाऱ्या गीतिका बिंद्रा हिने पतीसोबत वाद झाल्यानंतर फरिदाबाद पोलिस स्टेशन सेंट्रलमध्ये तक्रार दाखल केली होती. यामध्ये पती विवेक बिंद्रासोबत अनेक वर्षांपासून वाद सुरू असल्याचे म्हटले होते. आपल्या जीवाला धोका असल्याचे गीतिकाने विवेकला सांगितले होते. त्यांच्यात घटस्फोटाचा खटला कोर्टात सुरू आहे, ज्यामध्ये तिने बिंद्राकडे भरणपोषणही मागितले आहे. दोघांनाही एक मुलगा आहे.