बजाज लाईफचे चीफ ऑपरेशन्स अँड कस्टमर एक्सपीरियन्स ऑफिसर म्हणून विवेक गुप्ता यांची पदोन्नती

By: Editor_Manas

On: Thursday, October 1, 2026 4:27 PM

Google News
Follow Us

पुणे, 1 ऑक्टोबर 2026: भारतातील अग्रगण्य खासगी जीवन विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या बजाज लाईफ इन्शुरन्सने आज विवेक गुप्ता यांची चीफ ऑपरेशन्स अँड कस्टमर एक्सपीरियन्स ऑफिसर (Chief Operations & Customer Experience Officer) म्हणून पदोन्नती जाहीर केली. आपल्या नवीन भूमिकेत, ते ऑपरेशनल उत्कृष्टता मजबूत करण्यावर आणि ग्राहक तसेच भागीदारांना अखंड अनुभव देण्यावर लक्ष केंद्रित करतील.

विमा उद्योगात विवेक यांना दोन दशकांहून अधिक अनुभव असून, व्यवसाय परिवर्तन, नावीन्य आणि धोरणात्मक वाढ घडवून आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्राहकांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि उद्योग पद्धतींना नव्याने परिभाषित करण्यासाठी व्हर्च्युअल रिॲलिटी (Virtual Reality) आणि कॉन्वर्सेशनल एआय (Conversational AI) यांसारख्या उपक्रमांचे यापूर्वी त्यांनी नेतृत्व केले.

आपल्या विस्तारित भूमिकेत, कंपनीची संपूर्ण ऑपरेशन्स, ग्राहक अनुभव आणि एआय (AI) व नवोपक्रम (Innovation) या विभागांचे काम विवेक पाहतील. यामध्ये पॉलिसी सेवा, दावा व्यवस्थापन, जोखीम प्रशासन, पॉलिसी नूतनीकरण, तक्रार निवारण, शाखांचे कामकाज, व्यवसाय सातत्य (business continuity), डिजिटल स्वयं-सेवा प्लॅटफॉर्म्स तसेच वितरक आणि भागीदार यांच्याशी समन्वय अशा बाबींचा समावेश असेल. प्रक्रिया सुलभीकरण, सेवा कार्यक्षमता वाढवणे, एआय-आधारित नवोपक्रमांना चालना देणे आणि पॉलिसीच्या संपूर्ण कालावधीत ग्राहकांना अखंड आणि सुलभ अनुभव (seamless customer journeys) मिळवून देणे या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतील.

बजाज लाईफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, तरुण चुघ म्हणाले, “बजाज लाईफच्या प्रवासाचा विवेक हे एक अविभाज्य भाग आहेत. विमा परिसंस्थेची सखोल जाण आणि एआय (AI) तसेच नवोन्मेषातील त्यांच्या कौशल्याच्या जोरावर, त्यांनी आमच्या धोरणात्मक नियोजन आणि परिवर्तन कार्यक्रमात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांची पदोन्नती ही, संस्थेअंतर्गत प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या आणि त्यांच्यासाठी संधी निर्माण करण्याच्या, तसेच संस्थेबरोबर मोठ्या झालेल्या नेत्यांना ओळखण्याच्या आमच्या विश्वासाचेही प्रतीक आहे. ते ही विस्तारित जबाबदारी स्वीकारत असताना, आमचे कामकाज, ग्राहक अनुभव आणि नवोन्मेषाचे प्राधान्यक्रम एकत्र आणण्यासाठी, तसेच आमच्या ग्राहकांना त्यांची ध्येये साध्य करण्यासाठी सतत पाठिंबा देत राहण्यासाठी, आम्हाला त्यांच्या नेतृत्वाची अपेक्षा आहे.”

आपल्या नियुक्तीबाबत विवेक गुप्ता म्हणाले, “जेव्हा ग्राहकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आमची सर्वाधिक गरज असते, तेव्हा त्यांच्या पाठीशी उभे राहणे ही आमची जबाबदारी आहे, यावर आमचा ठाम विश्वास आहे. ग्राहकांशी होणारा प्रत्येक संवाद हा  विश्वास दृढ करण्याची, अनुभव सुलभ करण्याची आणि ग्राहक ज्या भविष्याचे नियोजन करत आहेत त्याबद्दल त्यांना अधिक आत्मविश्वास देण्याची एक संधी असते. आम्ही निर्माण केलेल्या भक्कम पायावर अधिक प्रगती साधण्यासाठी आणि संपूर्ण संस्थेमध्ये ग्राहक-केंद्रितता, विश्वास तसेच उत्कृष्टतेची संस्कृती अधिक रुजवण्यासाठी मी आमच्या टीम्ससोबत काम करण्यास उत्सुक आहे.”

बजाज लाइफ इन्शुरन्सच्या कार्यक्षमतेतील उत्कृष्टता, ग्राहक-केंद्रितता आणि तंत्रज्ञानावर आधारित नावीन्य यावरील सातत्यपूर्ण लक्ष ही नियुक्ती अधिक दृढ करते; कारण विकासाच्या पुढील टप्प्यासाठी कंपनी आपली क्षमता विकसित करत आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now