घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !
पुणे – महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे नवरात्र ! नवरात्र हे देवीचे व्रत असून महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी हे व्रत कुलाचार म्हणूनसुद्धा पाळले जाते. या व्रतात नऊ दिवस व्रतस्थ राहून देवीची मनोभावे आराधना केली जाते.सनातन संस्था धर्मशिक्षण,धर्मजागृती साठी कार्यरत असून ठिकठिकाणी विविध उपक्रमांच्या आयोजनातून समाजात प्रबोधन करत आहे. याचाच एक भाग म्हणून आकुर्डी (चिंचवड) येथील भवानी माता मंदिर आणि पुणे येथील ‘चतुःशृंगी’ या स्वयंभू जागृत शक्तीस्थानाच्या ठिकाणी सनातन निर्मित आध्यात्मिक ग्रंथ प्रदर्शन आणि सनातनची सात्त्विक उत्पादनांचे प्रदर्शन लावण्यात येणार आहे.
हे प्रदर्शन 11 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर दरम्यान चतुःश्रृंगी, पुणे येथे सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत आणि भवानी माता मंदिर,आकुर्डी येथे सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत खुले राहणार आहे. भाविकांनी आणि भक्तांनी याचा अधिकाधिक लाभ घावा असे आवाहन सनातन संस्थेचे प्रा.विठ्ठल जाधव यांनी केले आहे. सनातनच्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी ७०३८७१३८८३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.