पुणे, दि. ४ सप्टेंबर २०२६ : भारतीय ग्राहक तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीचा स्वदेशी ब्रँड Mivi ने स्मार्टफोन बाजारात अधिकृत प्रवेश करत ‘Mivi One’ या पहिल्या स्मार्टफोनची घोषणा केली आहे. Qualcomm, Google आणि Flipkart यांच्या धोरणात्मक भागीदारीत विकसित करण्यात आलेला हा स्मार्टफोन २४ सप्टेंबरपासून केवळ फ्लिपकार्टवर विक्रीस उपलब्ध होणार आहे.
भारतीय ग्राहकांच्या गरजा आणि वापराच्या सवयी लक्षात घेऊन तयार करण्यात आलेला Mivi One हा आपल्या श्रेणीतील Snapdragon 5G चिपसेटसह येणारा भारतातील एकमेव स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
भारतातच डिझाइन आणि उत्पादन
ऑडिओ उत्पादनांच्या क्षेत्रात ट्रू वायरलेस इअरबड्स, नेकबँड, हेडफोन्स, स्पीकर्स आणि साउंडबार्समुळे ओळख निर्माण केलेल्या Mivi ने आता स्मार्टफोन क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. संशोधन, डिझाइन, अभियांत्रिकी आणि उत्पादन या सर्व प्रक्रिया भारतातच पार पडणार असून हैदराबाद येथील अत्याधुनिक उत्पादन केंद्रात Mivi One चे उत्पादन केले जाणार आहे.
Mivi One ची प्रमुख वैशिष्ट्ये
- Qualcomm Snapdragon 5G मोबाइल प्लॅटफॉर्ममुळे जलद 5G कनेक्टिव्हिटी आणि दमदार परफॉर्मन्स.
- भारतीय ग्राहकांच्या गरजांनुसार विकसित केलेले ‘India-First’ डिझाइन.
- स्थानिक संशोधन, अभियांत्रिकी आणि उत्पादन क्षमतेवर आधारित स्मार्टफोन.
- फ्लिपकार्टच्या देशव्यापी वितरण नेटवर्कद्वारे संपूर्ण भारतात उपलब्धता.
‘जागतिक दर्जाचा भारतीय टेक ब्रँड’ घडविण्याचे ध्येय
Mivi चे सह-संस्थापक विश्वनाथ कंडुला म्हणाले, “गेल्या दशकात आम्ही भारतीय ग्राहकांसाठी दर्जेदार तंत्रज्ञान उत्पादने विकसित करण्याची क्षमता सिद्ध केली आहे. स्मार्टफोन हा आमच्या प्रवासातील पुढचा स्वाभाविक टप्पा आहे. Mivi One हा केवळ आमचा पहिला स्मार्टफोन नसून भारतातून जागतिक दर्जाचा ग्राहक तंत्रज्ञान ब्रँड उभारण्याच्या महत्त्वाकांक्षेची सुरुवात आहे.”
भारतीय ग्राहकांसाठी वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न
Mivi चे चीफ बिझनेस ऑफिसर हिमांशू टंडन यांनी सांगितले की, आजचा ग्राहक कामगिरी, डिझाइन, विश्वासार्हता आणि मूल्य या सर्व बाबींमध्ये तडजोड स्वीकारत नाही. “भारतीय ग्राहकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर विकसित केलेला Mivi One हा आमच्या स्मार्टफोन व्यवसायाचा पाया ठरेल. आम्ही केवळ नवीन उत्पादन श्रेणी वाढवत नसून भारतीय ग्राहकांसाठी वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत,” असे ते म्हणाले.
फ्लिपकार्टची साथ
फ्लिपकार्टचे वरिष्ठ संचालक मुकुंद केडिया यांनी सांगितले की, “भारतीय ग्राहक स्वदेशी ब्रँड्सवर अधिक विश्वास दाखवत आहेत. ऑडिओ क्षेत्रात Mivi ने ग्राहकांचा विश्वास संपादन केला असून स्मार्टफोन क्षेत्रातील त्यांचा प्रवेश हा त्याच यशाचा पुढचा टप्पा आहे. फ्लिपकार्टच्या व्यापक डिजिटल कॉमर्स नेटवर्कच्या माध्यमातून Mivi One देशभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचवताना आम्हाला आनंद होत आहे.”





