Bhandara Crime News : भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद

By: Editor_Pratik

On: Friday, August 7, 2026 3:35 AM

Google News
Follow Us

Bhandara Crime News: भंडारा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वार्डात गुरुवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास माणुसकीला काळीमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका अवघ्या 3 वर्षांच्या चिमुकल्या बालिकेला आमिष दाखवून एका 30 वर्षीय नराधमाने सार्वजनिक शौचालयात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण भंडारा शहरात तीव्र संतापाची लाट पसरली असून, घटनेच्या निषेधार्थ आज ‘भंडारा बंद’ची (Bhandara Bandh) हाक देण्यात आली आहे.

रोहित वासनिक (वय 30) असे या आरोपीचे नाव असून तो अविवाहित आहे. तसेच तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याची माहिती समोर आली आहे. नराधम रोहित याने चिमुकलीला शौचालयात नेऊन अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बालिकेने आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिकांच्या ही बाब तात्काळ लक्षात आली. नागरिकांनी प्रसंगावधान राखून आरोपी रोहित याला जागेवरच पकडले आणि संतप्त जमावाने त्याला चांगलाच चोप दिला. जमावाच्या तावडीतून सुटण्याच्या प्रयत्नात आरोपीने स्वतःला टाइल्सच्या तुकड्याने मारहाण करून जखमी करून घेतले.

घटनेनंतर पीडित बालिका आणि जखमी आरोपी या दोघांनाही उपचारासाठी भंडारा मेडिकल कॉलेजमध्ये (Bhandara Medical College) दाखल करण्यात आले. घटनेचे वृत्त शहरात वाऱ्यासारखे पसरताच शेकडो भंडारावासी मेडिकल कॉलेज परिसरात जमा झाले. “नराधम आरोपीवर उपचार करू नका आणि त्याला तात्काळ नागरिकांच्या स्वाधीन करा,” अशी आक्रमक भूमिका घेत संतप्त नागरिकांनी थेट रुग्णालयात ठिय्या मांडला.

जवळपास 7 तास मेडिकल कॉलेज परिसरात अत्यंत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून भंडारा शहरासह पोलीस मुख्यालय, राखीव पोलीस दल आणि जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांतून अतिरिक्त पोलीस कुमक तातडीने तैनात करण्यात आली.

रुग्णालय परिसरातील वाढता तणाव पाहता प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक मोरे, उपविभागीय अधिकारी तिखे आणि मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता डॉ. दुधगावकर यांनी संतप्त नागरिकांशी सविस्तर चर्चा केली. आरोपीवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आणि त्याला कठोर शिक्षा देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर रात्री 11 वाजेच्या सुमारास नागरिकांचा रोष शांत झाला.

या दुर्दैवी प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात (Fast Track Court) चालवण्यात यावा, तसेच आरोपीचे वकीलपत्र कोणत्याही वकिलाने घेऊ नये, या मागणीसाठी आज भंडारा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर भंडारा शहरातील मुख्य बाजारपेठ आणि दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

August 6, 2026

August 6, 2026

August 6, 2026

August 5, 2026

August 5, 2026

August 4, 2026