स्वसंरक्षण शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद ; हिंदु जनजागृती समितीचा उपक्रम

By: Editor _2

On: Monday, June 8, 2026 5:41 AM

Google News
Follow Us

हर घर योद्धा स्वसंरक्षण शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद; २४४ जणांचा सहभाग, १४४ जणांना प्रशस्तीपत्रके

पुणे — युवक आणि युवतींनी स्वसंरक्षणाच्या माध्यमातून शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम व्हावे, या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सात दिवसीय ‘हर घर योद्धा’ स्वसंरक्षण शिबिरांना पुणे जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. १९ एप्रिलपासून सुरू झालेल्या या अभियानांतर्गत नायगाव, पेठ, लोणी काळभोर, कोलवडी, थेऊर, पांडवदंड, दहिटणे, शिरवळ, भोर, तळेगाव दाभाडे आणि राजगुरूनगर येथे शिबिरे पार पडली.

या शिबिरांमध्ये एकूण २४४ युवक  व युवतींनी सहभाग घेतला. त्यापैकी १४४ जणांनी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्याने त्यांना प्रशस्तीपत्रके प्रदान करण्यात आली. स्वसंरक्षणाच्या विविध तंत्रांसह मानसिक सक्षमीकरण, प्रसंगावधान आणि संकटसमयी योग्य निर्णय घेण्याचे प्रशिक्षण शिबिरात देण्यात आले.

प्रशिक्षण घेतलेल्या सहभागींकडूनही सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. कु. श्रावणी माळवे यांनी, “या शिबिरामुळे आत्मविश्वास वाढला असून कोणत्याही संकटाला धैर्याने सामोरे जाण्याची तयारी झाली”, असे सांगितले. तर नायगाव येथील सौ. सुप्रिया चौधरी यांनी, “अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची मानसिकता आणि मनाने अधिक कणखर होण्याची प्रेरणा या शिबिरातून मिळाली”, असे मत व्यक्त केले.

शिबिरांच्या यशस्वितेमागे स्थानिक स्वयंसेवक आणि ग्रामस्थांचेही मोठे योगदान राहिले. कोलवडी येथील युवकांनी शिबिराचा प्रसार करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. थेऊर येथे ग्रामस्थांनी घरोघरी जाऊन जनजागृती करत शिबिराच्या आयोजनात सक्रिय सहभाग नोंदवला. शिरवळ येथे मे महिन्याच्या कडक उन्हात दुपारच्या वेळेत शिबिर होत असूनही युवतींचा उत्साह कायम राहिला. स्थानिक शाळेच्या मुख्याध्यापिकांनीही शिबिरासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या.

महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक महिलेला स्वतःचे संरक्षण करता यावे, आत्मविश्वासाने जगता यावे आणि संकटांचा धैर्याने सामना करता यावा, यासाठी अशा प्रकारची प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जात असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

दरम्यान, ‘हर घर योद्धा’ अभियानाचा विस्तार करण्यात येत असून लवकरच कोथरूड, कात्रज आणि पुणे शहरातील विविध भागांमध्ये नवीन शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. इच्छुक युवक  व युवतींनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी संपर्क : ८९८३३३५५१७

 

   

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

फोर्स मोटर्स

July 23, 2026

July 23, 2026

July 21, 2026

July 21, 2026

July 21, 2026

July 21, 2026