महिंद्राची 8 दशकांची परंपरा, विकास आणि भविष्यकालीन दृष्टीकोनाचे दर्शन घडविणारे महिंद्रा म्युझियम ऑफ लिव्हिंग हिस्ट्री

By: Editor_Manas

On: Tuesday, May 19, 2026 4:18 PM

Google News
Follow Us

मुंबई, मे 2026: महिंद्रा समूहाने मुंबईतील वरळी येथील महिंद्रा टॉवर्समध्ये ‘द म्युझियम ऑफ लिव्हिंग हिस्ट्री’ हे संवादात्मक असे स्थळ जुलै 2022 मध्ये सुरू केले. केवळ भूतकाळाचे प्रदर्शन म्हणून नव्हे तर त्यापेक्षा अधिक काही सादर करण्याच्या उद्देशाने या संग्रहालयाची रचना आणि डिझाइन करण्यात आले. समूहाच्या गेल्या 8 दशकांच्या ऐतिहासिक परंपरेला त्याच्या सतत बदलणाऱ्या वर्तमानाशी आणि अनोख्या भविष्याशी जोडणारे ते सातत्यपूर्ण माध्यम बनले. अद्वितीय उपक्रम म्हणून, ‘द म्युझियम ऑफ लिव्हिंग हिस्ट्री’ या संग्रहालयातून सातत्याने महिंद्रा समूह, त्यांचा उद्देश, इथे काम करणारे लोक आणि त्यांची तत्वं यांचे दर्शन घडत आहे.

या आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाच्या निमित्ताने महिंद्रा समूह आपल्या समूहाचा 81 वर्षांचा वारसा आणि परंपरा; उद्देशप्रेरित विकास आणि महिंद्रा ब्रँडसाठीचा भविष्यातील दृष्टीकोन अनुभवण्यासाठी ‘म्युझियम ऑफ लिव्हिंग हिस्ट्री’ मध्ये सर्वांचे स्वागत करत आहे. हे अद्वितीय आणि वैशिष्ट्यपूर्ण संग्रहालय विशेष कलात्मक मांडणी सादरीकरण, निवडक चित्रपट आणि वैयक्तिक कथनांद्वारे समूहाचा इतिहास आणि मूल्ये प्रदर्शित करत आहे.

“’म्युझियम ऑफ लिव्हिंग हिस्ट्री’ संग्रहालय समूहाच्या तत्त्वज्ञान आणि मूलभूत मूल्यांप्रती निष्ठावंत राहत महिंद्राच्या बदलत्या व्यवसाय आणि सांस्कृतिक परिक्षेत्राचे प्रतिबिंब दाखवण्यासाठी स्वतःला विकसित करत आहे. या सतत बदलणाऱ्या जगातील एक जिवंत, चैतन्यमयी अशा आपल्या संस्थेतील व्यवसाय आणि आपल्या लोकांच्या कथांचा हा समृद्ध संग्रह आपल्या ब्रँडचे प्रतिबिंब आहे.”

–    महिंद्रा समूहाचे अध्यक्ष श्री. आनंद महिंद्रा

डिझाइन आणि क्रिएटिव्ह सल्लागार एल्सी नानजी आणि ‘अनुभव’ डिझायनर हर्ष मनराव यांच्या  संकल्पनेतून हे साकारले आहे. येथे महिंद्राच्या मूलभूत मूल्ये आणि तत्त्वे, त्याचे विविध व्यवसाय, समृद्ध इतिहास आणि भविष्यावरील दृष्टीकोन यांची कथा सांगणाऱ्या विशेषतः तयार करण्यात आलेल्या कलाकृती आहेत. हे संग्रहालय महिंद्रा समूहाच्या उच्चस्तरीय तत्त्वज्ञानाचा उत्सव साजरा करते. प्रयत्न आणि विजय, मूल्ये, नैतिकता आणि समाजाबद्दलची बांधिलकी यांच्या कथा येथे जिवंत करण्यात आल्या आहेत. लोकांनी शिकण्यासाठी, शेअर करण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी एकत्र यावे अशा जागेच्या स्वरूपात या संग्रहालयाची संकल्पना करण्यात आली आहे.

मुख्य वैशिष्ट्ये:

Ø  एक जिवंत, चैतन्यमयी वारसा

पारंपरिक म्युझियम्सपेक्षा वेगळे असे हे एक गतिशील आणि सतत विकसित होणारे स्थळ आहे. येथे काहीही स्थिर नाही. अलीकडील काळात, या संग्रहालयात एका ‘कल्चर वॉल’ची म्हणजेच सांस्कृतिक दालनाची भर पडली आहे. महिंद्रा सीझन ऑफ फेस्टिव्हल्स द्वारे देशाच्या संगीत क्षेत्रातील समूहाच्या योगदानाचे कलात्मक प्रतिबिंब दिसून येते. महिंद्रा रीफ्रेज्ड व्हल्यूज’ चे सर्जनशील सादरीकरण हे आणखी एक आकर्षण.

Ø  महिंद्राचा प्रवास

संग्रहालयाची ऐतिहासिक कथा भारताच्या कहाणीशी घट्टपणे जोडलेली आहे. जसा देश प्रगती करत आणि बदलत गेला, तसाच महिंद्रा समूहही नव्या नव्या गोष्टी अंगीकारत,  नवकल्पना आणत विस्तारत गेला. समूहाचे व्यवसाय काळानुसार विकसित झाले असले, तरी त्याची मूलभूत मूल्ये कायम स्थिर राहिली असून त्यांनी त्याच्या वाढीस आधार दिला आहे.

Ø  जिथे उद्देश आणि डिझाइन एकत्र येतात

संग्रहालयाची वास्तुरचना नॉटिलसपासून प्रेरित आहे. त्याचा बाहेरच्या बाजूने गुंडाळलेला चक्रीय आकार समूहाच्या वाढीच्या, प्रभावाच्या, विस्ताराच्या आणि सतत नूतनीकरणाच्या प्रवासाचे प्रतीक आहे. आतमध्ये, टेक्स्चर आणि प्रकाशाचा भविष्यवादी संगम गती आणि प्रगतीची अनुभूती निर्माण करतो. ही जागा 80 वर्षांच्या समृद्ध वारशाला वर्तमान आणि भविष्याच्या शक्यतांशी अखंडपणे जोडते. हा अद्वितीय उपक्रम समूहाचा उद्देश, त्यातील लोक आणि त्यांचा दृष्टीकोन प्रतिबिंबित करतो. उद्देश आणि डिझाइन एकत्र येण्याची संकल्पना संग्रहालयाच्या केंद्रस्थानी आहे.

Ø  कथांचे संग्रहालय

या संग्रहालयाच्या केंद्रस्थानी कथा आहेत. प्रदर्शनातली प्रत्येक गोष्ट व्यक्तींच्या योगदानाचा गौरव करते. व्यक्तिमत्त्वांचा नव्हे. आणि संस्थेला परिभाषित करणारी मूल्ये, संस्कृती आणि तत्त्वज्ञान जिवंत करते. या कथांद्वारे, अभ्यागतांना समूहाच्या प्रवासाला आकार देणाऱ्या मानवी भावनेचा अनुभव मिळतो.

Ø  अनुभवांची विविधता

प्रत्येक अभ्यागत आपला वेगळा दृष्टिकोन घेऊन येत असल्याचे समजून घेत संग्रहालय बहुविध कथनशैली स्वीकारते. त्याच्या जागांमधील प्रत्येक प्रवास वैयक्तिक असतो.  त्यामध्ये विविध अर्थ आणि अनुभव मिळतात. येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस संग्रहालय वेगळ्या प्रकारे भावेल हे सुनिश्चित करत अनुभवांची ही विविधता संग्रहालयाच्या उद्देशाचा मुख्य भाग आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now