पुणे | मे 19, 2026: ह्युंडाई मोटर इंडिया फाऊंडेशन (एचएमआयएफ) या ह्युंडाई मोटर इंडिया लिमिटेडच्या सीएसआर शाखेने आज पुणे जिल्ह्यातील नवलाख उंबरे, मावळ येथे अधिकार कनेक्ट केंद्राचे उद्घाटन केले आणि अधिकार कनेक्ट वाहन’ला हिरवा झेंडा दाखवला. या माध्यमातून कंपनीने महाराष्ट्रातील सर्वसमावेशक विकास आणि कल्याणकारी योजना व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ केली. पुण्यातील हे उद्घाटन म्हणजे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आलेल्या ह्युंडाईच्या व्यापक सीएसआर कटिबद्धतेचा पुढील टप्पा आहे, ज्यांतर्गत एचएमआयएफ राज्यामध्ये 56 कोटी रूपयांची सामाजिक विकास गुंतवणूक करत आहे.
प्रोजेक्ट अधिकार कनेक्टची रचना गरजू आणि वंचित घटकांना कागदपत्रांची पूर्तता, पात्रतेविषयी मार्गदर्शन, अर्ज भरण्यास मदत आणि दारापर्यंत पोहोचून सेवा देणे यांसारख्या माध्यमातून शासकीय कल्याणकारी आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी करण्यात आली आहे. शासकीय योजनांच्या तरतूदी आणि या हक्कांपर्यंत पोहोचताना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागणारे नागरिक यांच्यातील तफावत दूर करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या उपक्रमाद्वारे महाराष्ट्रातील नागरिकांसाठी 350 कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे सामाजिक सुरक्षा फायदे मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा आहे. दरवर्षी 1 लाखांहून अधिक व्यक्तींच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकण्याचे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे, ज्याद्वारे महाराष्ट्रातील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत हे फायदे पोहोचतील याची खात्री केली जाईल. हा उपक्रम प्रामुख्याने दुर्गम आणि वंचित घटकांवर लक्ष केंद्रित करेल, ज्यामुळे कल्याणकारी योजनांचा लाभ खरोखर गरज असलेल्या व्यक्तींपर्यंत पोहोचू शकेल.
डिजिटल ओळख असलेले एक योजना कार्ड नागरिकांना दिले जाईल, जे पद्धतशीर रेकॉर्ड-कीपिंगसह योजनांचे फायदे मिळवणे सोपे करेल. अधिकार कनेक्ट केंद्र हे डिजिटल सक्षमीकरण सहाय्य, वित्तीय साक्षरता उपक्रम आणि कौशल्य विकास संधी प्रदान करून समुदायाची क्षमता वाढवणारे एक संसाधन केंद्र म्हणूनही काम करेल.
हा उपक्रम अधिकार सखी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रशिक्षित समुदाय समन्वयकांमार्फत राबवला जाईल, ज्यांना गावोगावी आणि पोहोचण्यास कठीण असलेल्या भागांमध्ये सेवांचा विस्तार करण्यास मदत करतील अशा अधिकार कनेक्ट वाहन’चे सहकार्य लाभेल. तळागाळातील नागरिकांना सुविधा देण्यासाठी आणि त्यांच्यात जागरूकता निर्माण करण्यासाठी या उपक्रमांतर्गत जवळपास 200 अधिकार सखी आणि स्वयंसेवक जोडले जातील.
व्यापक परिणामांवर लक्ष केंद्रित करत प्रोजेक्ट अधिकार कनेक्ट सध्या पुणे, नाशिक आणि गुरुग्राममध्ये प्रभावीपणे कार्यरत आहे. दुर्गम आणि वंचित घटकांपर्यंत आपली पोहोच अधिक दृढ करत हा प्रकल्प आता महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात ही विस्तार करत आहे.
या उपक्रमाबाबत मत व्यक्त करत श्री. पुनीत आनंद, एव्हीपी अँड व्हर्टिकल हेड, कॉर्पोरेट अफेयर्स, कॉर्पोरेट कम्युनिकेशन अँड सोशल, ह्युंडाई मोटर इंडिया लिमिटेड म्हणाले, “ह्युंडाईमध्ये आम्ही असा विश्वास ठेवतो की, जेव्हा नागरिक सन्मानाने आणि आत्मविश्वासाने संधी, हक्क आणि कल्याणकारी योजनांचा लाभ घेऊ शकतात, तेव्हाच खऱ्या अर्थाने सामाजिक बदलाची सुरुवात होते. प्रोजेक्ट अधिकार कनेक्टच्या माध्यमातून आम्ही शासकीय कल्याणकारी तरतूदी आणि ज्यांना त्यांची सर्वात जास्त गरज आहे अशा समुदायांमधील तफावत दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. महाराष्ट्र हे आमच्यासाठी नेहमीच एक महत्त्वाचे केंद्र राहिले आहे आणि हा उपक्रम सर्वसमावेशक व समुदाय-केंद्रित विकासाप्रती असलेली आमची दीर्घकालीन वचनबद्धता दर्शवतो.”
संयुक्तपणे डिझाइन करण्यात आलेला हा उपक्रम एचएमआयएफचा (HMIF) विश्वसनीय अंमलबजावणी भागीदार असलेला ‘हकदर्शक एम्पॉवरमेंट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड’द्वारे प्रत्यक्ष पातळीवर कार्यान्वित केला जात आहे. हकदर्शककडे डिजिटल साधनांचा वापर आणि मानवी सहाय्य यांचा संगम करून शेवटच्या टप्प्यापर्यंत कल्याणकारी सेवा पोहोचविण्याचा सखोल अनुभव आहे. प्रशिक्षित फील्ड एजंट्सच्या मदतीने राबवला जाणारा हा समुदाय-केंद्रित दृष्टिकोन लाभार्थी ओळखण्यात, अधिकार सखींना सोबत जोडण्यात आणि केंद्राच्या माध्यमातून संपूर्ण सहाय्य पुरविणे या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतो.
मावळ, पुणे येथे “अधिकार कनेक्ट केंद्र” सुरू करून एचएमआयएफने कल्याणकारी सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. या उपक्रमाद्वारे संस्था, शासन आणि समुदायातील सहकार्याने लोकांच्या जीवनात खऱ्या अर्थाने बदल घडवता येतो, हे अधोरेखित होते.





