उन्हाळी सुट्टीत मामाच्या गावाला जाणं पडणार महागात; तिकीटाच्या दरात मोठी वाढ

By: Editor_Pratik

On: Wednesday, April 8, 2026 10:40 AM

Google News
Follow Us

उन्हाळी सुट्टीत मामाच्या गावाला जाणं पडणार महागात; तिकीटाच्या दरात मोठी वाढ

मुंबई : एसटीनं सुट्टीत प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी खिशाला चाट देणारी बातमी दिली आहे. एसटी महामंडळानं उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता आणि त्यामुळं होणारी गर्दी लक्षात घेता भाडेवाढ (ST Bus Ticket Rate) केलीय. माहितीनुसार, साध्या बसेसच्या दरामध्ये दहा टक्के वाढ करण्यात आली आहे. 15 एप्रिल ते 15 जून या काळासाठी ही वाढ करण्यात आली आहे. फक्त साध्या बसेसला ही दरवाढ लागू होणार असून एसी किंवा शिवशाही, शिवनेरी तसंच शिवाई बसेसला ही दरवाढ लागू होणार नाही.

उन्हाळी गर्दीच्या हंगामामध्ये दरवाढ : राज्य परिवहन मंडळाने एसटी महामंडळाला विशिष्ट कालावधीत भाडेवाढ करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार एसटी महामंडळानं उन्हाळी गर्दीच्या हंगामामध्ये साध्या बससेवा प्रवास भाडे दरात दरवाढ केलीय. दहा टक्के इतकी दरवाढ करण्यात आली आहे.

30 टक्के दरवाढ करण्यास मान्यता : यात्रा, सणासुदीचा काळ, सुट्ट्या, सप्ताह अखेर या कालावधी दरम्यान 30 टक्के दरवाढ करण्यास मान्यता एसटी महामंडळाला मिळाली आहे. या अनुषंगानं एसटी महामंडळानं उन्हाळी गर्दीच्या हंगामामध्ये ही दरवाढ लागू केली आहे. वातानुकूलित शिवनेरी, शिवशाही तसंच शिवाई या बससेवासह निम आराम (हिरकणी) आणि शयनयान बसेसची तिकीट दरवाढ केलेली नाही.

‘या’ बस सेवांना दरवाढ नाही : साधा बससेवा प्रकार वगळता निमआराम, विनावातानुकुलीत शयनआसनी, विनावातानुकुलीत शयनयान, शिवशाही (वातानुकुलीत), जनरिवनेरी (वातानुकुलीत), शिवनेरी (वातानुकुलीत), 9 मीटर ई-बस (वातानुकुलीत), 12 मीटर ई-बस,ई-डिवाई (वातानुकुलीत) या बससेवा प्रकाराच्या प्रवासभाड्यात उन्हाळी गर्दीच्या हंगाम कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही.

आधीपासून आरक्षित तिकीट काढलं असेल तर काय? : दिनांक 14 एप्रिल 2026 व 15 एप्रिल 2026 च्या मध्यरात्रीपासून बससेवेमधून प्रवास सुरू करणाऱ्या प्रवाशांना सुधारित दराने तिकीट आकारणी करण्यात येणार आहे. ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले असेल, अशा प्रवाशांकडून त्या आरक्षण तिकिटाचा जुना तिकीटदर तसंच नवीन तिकीटदर यातील फरक वाहकाने वसूल करावा असं आदेशात नमूद आहे. याविषयीचे आदेश डॉ. माधव कुसेकर उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एसटी महामंडळ यांनी जारी केले आहेत.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

April 8, 2026

April 7, 2026

किर्लोस्कर

April 7, 2026

टाटा एआयए

April 7, 2026

April 6, 2026

April 6, 2026