बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील ‘कॉर्पोरेट जिहाद’ व धर्मांतराचे षडयंत्र रोखा! – हिंदु जनजागृती समितीची प्रशासनाकडे आंदोलनाद्वारे मागणी!

By: Editor _2

On: Saturday, April 18, 2026 1:09 PM

Google News
Follow Us

‘लव्ह जिहाद’, ‘धार्मिक दहशत’ आणि ‘धर्मांतर रॅकेट’चा पर्दाफाश करा ! 

  पुणे : नाशिक येथील एका बहुराष्ट्रीय कंपनीत हिंदू महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, धर्मांतरासाठी दबाव, गोमांस भक्षणाची सक्ती आणि नमाज पठणाचे जे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत, त्यामागील विखारी जिहादी मानसिकता आणि संघटित गुन्हेगारी मोडीत काढावी, हा प्रकार केवळ नाशिकपुरता मर्यादित नसून मुंबईसह देशातील इतर शाखांमध्ये पसरलेले मोठे ‘कॉर्पोरेट जिहाद’ असू शकतो. त्याचप्रमाणे पुणे येथील एका आस्थापनात पण असे घडत असल्याची चर्चा सुरू आहे. याचीही चौकशी व्हावी. यामागील ‘लव्ह जिहाद’, ‘धार्मिक दहशत’ आणि ‘धर्मांतर रॅकेट’चा सखोल तपास करून यातील देशव्यापी साखळी उघड करावी, अशा मागण्यांकरिता हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आज दिनांक 17 एप्रिल रोजी सायंकाळी 5.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, हिंजवडी फेज 1, पुणे येथे हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन घेण्यात आले.
     या वेळी आंदोलनात बहुसंख्येने धर्माभिमानी सहभागी झाले होते. तसेच या वेळी विविध मागण्याचे निवेदन सिद्ध करून धर्माभिमान्यांच्या सह्या घेण्यात आल्या. सह्यांचे निवेदन मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रशासनाला देण्यात येणार आहे, असे हिंदु जनजागृती समितीचे पराग गोखले यांनी सांगितले.
    आंदोलनामध्ये हिंदू जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले, हिंदु राष्ट्र समन्वय समिती, राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती, स्वा. सावरकर युवा विचार मंच, तसेच विविध संघटनांचे मान्यवर उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना या विषयातील गंभीरतेवर मार्गदर्शन केले.
    नाशिक येथील सदर कंपनीतून 7 आरोपींना अटक झाली आहे. नाशिकमध्ये 7 सापडले, तर अन्य शहरात किती असतील ? ज्या कंपन्यांमध्ये हिंदू महिलांच्या अब्रूचे रक्षण होत नाही आणि जिथे ‘धार्मिक दहशत’ निर्माण केली जाते, अशा कंपन्यांचा व्यवसाय परवाना रद्द करून त्यांना टाळे ठोकण्यात यावे; तसेच राज्यातील सर्व आयटी आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचे तात्काळ ‘विशेष सुरक्षा आणि धार्मिक भेदभावविरोधी ऑडिट’ करण्याचे आदेश सरकारने द्यावेत. या आणि अशा स्वरूपाच्या अन्य मागण्या करण्यात आल्या आहेत.
    जर प्रशासनाने या नराधमांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या व्यवस्थेवर त्वरित कठोर कारवाई केली नाही, तर हिंदु जनजागृती समिती तसेच समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने राज्यभर तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा समितीने या वेळी दिला आहे.
For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

April 17, 2026

April 16, 2026

April 16, 2026

April 16, 2026

April 16, 2026

April 15, 2026