बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील ‘कॉर्पोरेट जिहाद’ व धर्मांतराचे षडयंत्र रोखा! – हिंदु जनजागृती समितीची प्रशासनाकडे मागणी

By: Editor _2

On: Wednesday, April 15, 2026 12:19 PM

Google News
Follow Us

राष्ट्रघातकी आतंकवादी स्लीपर सेलची सखोल चौकशी करा !

नाशिक : येथील एका बहुराष्ट्रीय कंपनीत हिंदू महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, धर्मांतरासाठी दबाव, गोमांस भक्षणाची सक्ती आणि नमाज पठणाचे जे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत, त्यामागील विखारी जिहादी मानसिकता आणि संघटित गुन्हेगारी मोडीत काढावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. हे केवळ नाशिकपुरते मर्यादित नसून मुंबईसह देशातील इतर शाखांमध्ये पसरलेले मोठे ‘कॉर्पोरेट जिहाद’ असू शकते. यामागील ‘लव्ह जिहाद’, ‘धार्मिक दहशत’ आणि ‘धर्मांतर रॅकेट’चा सखोल तपास करून यातील देशव्यापी साखळी उघड करावी, अन्यथा समिती जनआंदोलन छेडेल, असा इशारा समितीने एका निवेदनाच्या माध्यमांतून नाशिकचे पोलीस आयुक्त यांच्यासह निफाड, येवला, पिंपळगाव बसवंत या ठिकाणी जिल्हा आणि पोलीस प्रशासनाला देण्यात आला आहे. यात अनेक ठिकाणी समितीच्या रणरागिणी या महिला शाखेतील युवती व महिलांची सहभाग लक्षणीय होता.
     सदर कंपनीत ७ आरोपींना अटक झाली आहे. नाशिकमध्ये ७ सापडले, तर अन्य शहरात किती असतील ?  हे केवळ नाशिकपुरते मर्यादित नसून मुंबईसह देशातील इतर शाखांमध्ये पसरलेले मोठे ‘कॉर्पोरेट षड्यंत्र’ असू शकते. यामागील ‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतर रॅकेट’चा सखोल तपास करून यातील व्यापक तपास होण्याची आवश्यकता आहे. ज्या कंपन्यांमध्ये हिंदू महिलांच्या अब्रूचे रक्षण होत नाही आणि जिथे ‘धार्मिक दहशत’ निर्माण केली जाते, अशा कंपन्यांचा व्यवसाय परवाना रद्द करून त्यांना टाळे ठोकण्यात यावे; तसेच राज्यातील सर्व आयटी आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचे तात्काळ ‘विशेष सुरक्षा आणि धार्मिक भेदभावविरोधी ऑडिट’ करण्याचे आदेश सरकारने द्यावेत.
श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकच्या भूमीत जर ‘कॉर्पोरेट’च्या नावाखाली हिंदू महिलांची अब्रू लुटली जात असेल, तर हिंदू समाज शांत बसणार नाही. जर प्रशासनाने या नराधमांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या व्यवस्थेवर त्वरित कठोर कारवाई केली नाही, तर हिंदु जनजागृती समिती समस्त हिंदू संघटनांच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडेल, असा इशारा समितीने या प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now