Crime: वस्तू खरेदीसाठी दुकानात गेली, तिथेच ६ नराधमांची वाकडी नजर पडली अन्…; अल्पवयीन मुलीसोबत ३ दिवस नको ते घडलं

By: Editor_Pratik

On: Sunday, March 8, 2026 12:58 PM

crime womna
Google News
Follow Us

Crime : वस्तू खरेदीसाठी दुकानात गेली, तिथेच ६ नराधमांची वाकडी नजर पडली अन्…; अल्पवयीन मुलीसोबत ३ दिवस नको ते घडलं

झारखंडमधील पाकूर जिल्ह्यात एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच संपूर्ण परिसर हादरून गेला. सहा आरोपींनी अल्पवयीन मुलीला तीन दिवस बंदी बनवून ठेवले. नंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ही घटना जिल्ह्यातील मालपहारी ओपी पोलीस स्टेशन परिसरात घडली. पोलिसांनी सहा आरोपींपैकी तिघांना अटक केली आहे. इतरांचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकुर जिल्ह्यातील मालपहारी ओपी भागातील एक १५ वर्षीय मुलगी तिच्या गावातील एका दुकानात काही वस्तू खरेदी करण्यासाठी गेली होती. तिथे आधीच उपस्थित असलेल्या सहा तरुणांनी तिला जबरदस्तीने एका जड वाहनाच्या ट्रकमध्ये बसवले. एका निर्जन ठिकाणी नेले आणि ओलीस ठेवले. आरोपींनी तिच्यावर तीन दिवस सामूहिक बलात्कार केला.

पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन आरोपींना अटक केली. ज्यात मालपहाडी पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी दशरथ किस्कू, सकल टुडू आणि महेशपूर पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी प्रधान मरांडी यांचा समावेश आहे. घटनेत वापरलेला हायवा ट्रक देखील जप्त करण्यात आला आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे आणि त्यांना अटक करण्यासाठी छापे टाकण्यात येत आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

उर्वरित फरार आरोपींनाही लवकरच अटक केली जाईल. झारखंडमधील पाकुर जिल्ह्यातील मालपहाडी ओपी भागात घडलेल्या घटनेच्या काही दिवस आधी पाकुर जिल्ह्यातील हिरणपूर पोलीस स्टेशन परिसरात एका प्रियकराने स्वतःच्याच अल्पवयीन प्रेयसीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली होती. ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. राफेल सोरेन नावाच्या एका तरुणाने आपल्या अल्पवयीन प्रेयसीचे दुसऱ्या तरुणाशी प्रेमसंबंध असल्याचा संशय घेत क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्या.

प्रथम तिला हिरणपूर पोलीस स्टेशन परिसरातील एका निर्जन ठिकाणी भेटण्यासाठी बोलावले आणि तेथे त्याच्या मित्रांसह तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. सामूहिक बलात्कारानंतर तरुणाने त्याच्या मित्रांसह अल्पवयीन मुलीची हत्या केली. तिचा मृतदेह शेतात फेकून दिला. पोलिसांनी राफेल सोरेन आणि त्याचा मित्र एल्गिन टुडू यांना अटक केली. तर घटनेत सहभागी असलेल्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन बालसुधारगृहात पाठवण्यात आले

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now