BIG NEWS : राज्यात लॉकडाऊन लागणार की नाही? मोठी अपडेट समोर
मुंबई : देशात इंधनाचा तुटवडा असून लवकरच कोरोनाप्रमाणे लॉकडाऊन (Lockdown) लागणार, अशा आशयाचे संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये अस्वस्थतेची स्थिती निर्माण झाल्याचं चित्र आहे. त्यावर आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आपल्या देशात इंधनाचा पुरेसा साठा आहे, त्यामुळे कोणतेही संकट नाही. देशात कोणतेही लॉकडाऊन लागणार नाही, तशा आशयाच्या अफवा जर कुणी परसवत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “देशात कोणताही लॉकडाऊन लागणार नाही हे केंद्र सरकारने जाहीर केलं आहे. त्यामुळे या विषयी कोणतीही अफवा पसरवण्याऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल. अशा प्रकारचे फेक व्हॉट्सॲप मेसेज जरी फॉरवर्ड केली तरी तो गुन्हा ठरेल. त्यामुळे कुणीही खोट्या अफवा पसवरू नये, अन्यथा त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार.”
सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क हे 10 रुपयांनी कमी केलं आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचा वाढलेल्या किमतीचा भार हा आता तेल कंपन्याच सहन करणार आहेत. त्यामुळे सामान्य लोकांना अधिकच्या दरात पेट्रोल डिझेलची खरेदी करावी लागणार नाही अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
भारताच्या आजूबाजूच्या देशांमध्ये जवळपास शट डाऊनची परिस्थिती आली आहे. अशा वेळी भारतात मात्र घरगुती गॅसची कोणतीही कमतरता भासत नाही. त्यामुळे अफवेच्या आधारावर ग्राहकांनी पेट्रोल डिझेलसाठी रांगा लावू नयेत. आपल्याकडे एक महिना चालेल इतका पेट्रोल आणि डिझेलचा साठा आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
केंद्र सरकारने आखाती संकट काळात मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने पेट्रोल, डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी केली आहे. पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रूपयांची घट करण्यात आली आहे. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 13 रूपयांवरून 3 रूपयांवर आणण्यात आला आहे. तर डिझेलवरील उत्पादन शुल्क 10 रूपयांवरून शून्यावर आणला आहे. इंधन दरवाढीची शक्यता लक्षात घेत उत्पादन शुल्कात कपात करण्यात आली आहे.
दरम्यान, यावर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनीही लॉकडाऊनच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका असं नागरिकांना आवाहन केलं आहे. देशात लॉकडाऊन लावण्याचा सरकारचा कोणताही इरादा नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच युद्धासारख्या संकट काळात संयम बाळगणं महत्त्वाचं असून अफवा पसरवणं देशासाठी धोक्याचं ठरेल अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.





