मोठी बातमी! रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा, खरात प्रकरण भोवलं?

By: Editor_Pratik

On: Friday, March 27, 2026 4:55 PM

Rupali chakankar
Google News
Follow Us

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे चाकणकर यांनी राजीनामा सोपवला आहे. याआधी चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा दिला होता. त्यानंतर विरोधकांकडून त्यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. आता त्यांनी राजीनामा पक्ष नेतृत्वाकडे सोपवला आहे.

रुपाली चाकणकर यांनी सोशल मीडियावर राजीनाम्याबाबत एक पोस्ट केली आहे. याबाबत त्यांनी म्हटले की, खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. त्याच्या आर्थिक व्यवहारात, त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही, आजही तीच स्पष्ट व ठाम भूमिका आहे. तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच. खोटे, असत्य व कुठलाही पुरावा नसताना जे आरोप माध्यमांमधून होत आहेत, ते वेदनादायक आहे. सत्य प्रखरतेने सिद्ध होईलच.

हा तपास पारदर्शकपणे व निष्पक्षपणे व्हावा,ही माझी मागणी मी यापूर्वीच मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मा. पोलिस महासंचालक यांच्याकडे केली आहे. आज सकाळी फोनद्वारे आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार मी माझ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now