धर्मांतर आणि लँड जिहादचे संकट रोखण्यासाठी संभाजी महाराजांचा आदर्श घ्या! – अधिवक्ता सर्वेश मेहेंदळे

By: Editor _2

On: Wednesday, February 11, 2026 8:48 AM

Google News
Follow Us

हडपसर (पुणे) येथे ‘हिंदु राष्ट्र जागृती सभा’ उत्साहात संपन्न; 150 हून अधिक धर्मप्रेमींची उपस्थिती !

 

हडपसर (जिल्हा पुणे) – “स्वातंत्र्योत्तर काळात हिंदूंच्या असंघटितपणामुळे हिंदु स्वदेशातच अल्पसंख्याक होत आहेत. वक्फ कायदा, लँड जिहाद आणि लव्ह जिहाद यांद्वारे जिहादी कारवायांचे षडयंत्र रचले जात आहे. ही संकटे रोखण्यासाठी हिंदूंनी आता छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून संघटित होणे अनिवार्य आहे,” असे प्रखर प्रतिपादन सनदी लेखापाल आणि अधिवक्ता श्री. सर्वेश मेहेंदळे यांनी केले. हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने 8 फेब्रुवारी रोजी महादेववाडी (हडपसर) येथे आयोजित ‘हिंदु राष्ट्र जागृती सभे’त ते बोलत होते. सभेचा आरंभ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीपूजनाने झाला. यावेळी गोरक्षण आणि धर्मकार्य करणाऱ्या कु. शिवांश शुक्ला याचा सत्कार करण्यात आला.

वक्फ कायद्याच्या माध्यमातून जमिनी हडपण्याचे षड्यंत्र!

अधिवक्ता मेहेंदळे पुढे म्हणाले की, “1995 च्या वक्फ कायद्याचा गैरवापर करून देशातील 8 लाख एकरांहून अधिक जमीन बळकावली गेली आहे. रेल्वे आणि संरक्षण विभागानंतर वक्फ बोर्डाकडे सर्वाधिक जमीन असून पुण्यातही 1200 हून अधिक मालमत्ता वक्फ म्हणून घोषित केल्या आहेत. कोणतीही जागा ‘इस्लामिक धर्मकार्य’ सांगून लाटण्याचे प्रकार वाढले आहेत.” हिंदू मुलींचे धर्मांतर करण्यासाठी ‘लव्ह जिहाद’चा वापर आणि लोकसंख्या वाढीद्वारे 2047 पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचे नियोजित षड्यंत्र रचले जात आहे. त्यामुळे “धर्म टिकला तरच आपण टिकू शकतो. संभाजीराजांचा आदर्श घेऊन हिंदूंनी संघटित व्हायला हवे.”
या वेळी हिंदुराष्ट्र समन्वय समितीचे पुणे जिल्हा संयोजक श्री. सचिन घुले यांनी समितीच्या चालू असलेल्या कार्याविषयी आढावा मांडला. हिंदु जनजागृती समितीच्या कु. क्रांती पेटकर यांनी लव्ह जिहाद सारख्या समस्यांवर उपायांची आवश्यकता याविषयी मार्गदर्शन करताना महिलांनी धर्मशिक्षण आणि स्वसंरक्षण घेणे ही काळाची आवश्यकता असून त्यासाठी महिलांनी सिद्ध व्हावे असे आवाहन केले.

मान्यवरांची उपस्थिती !

या सभेला भाजपचे नगरसेवक श्री. अतुल नारायण तरवडे, भाजपच्या नगरसेविका सौ. प्राची आल्हाट, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, महादेववाडी याचे विश्वस्त श्री. बाळासाहेब घुले, श्री. आप्पेश घुले आणि श्री. अंकुश घुले, हिंदुत्वनिष्ठ श्री रवी घुले, श्री. बाळा घुले, श्री सुहास घुले,श्री गणेश शेवाळे, शिवप्रेमी हनुमान मंदिराचे अध्यक्ष श्री. सुनिल आप्पा घुले तसेच अनेक हिंदुत्वनिष्ठ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now