कोरियन स्ट्रीट फूडची अस्सल चव भारतात आणणाऱ्या पहिल्या कोरियन क्विक-सर्व्हिस रेस्टॉरंट (क्यूएसआर) ब्रँड सोल डॅक ने पुण्यातील विमान नगरमधील यशस्वी आउटलेटनंतर आता वाकड येथे आपले नवे क्यूएसआर सुरू केले आहे. या उद्घाटनाच्या निमित्ताने ग्राहकांसाठी ‘डी-डे (D-Day)’ ही मर्यादित कालावधीची आकर्षक ऑफर जाहीर करण्यात आली असून, ती केवळ वाकड येथील आउटलेटपुरतीच उपलब्ध आहे.
या विशेष ऑफरअंतर्गत ‘डॅक डॅक’ स्वरूपात दोन कोरियन चिकन पीस अवघ्या ५९ रुपयांत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ही ऑफर १७ जानेवारी रोजी दुपारी १२ ते ३ या वेळेत लागू राहील. वाकड येथील हे नवे क्यूएसआर भूमकर चौक रोडवरील डब्ल्यूबिझ येथे आहे.

या आउटलेटमधून सोल डॅकचे हलके, कुरकुरीत आणि संतुलित मसाल्यांसाठी ओळखले जाणारे खास कोरियन फ्राइड चिकन तसेच कोरियन स्ट्रीट-स्टाइल व्यंजनांचा आस्वाद पुण्यातील खवय्यांना घेता येणार आहे. ‘डॅक डॅक’ व लॉन्च ऑफर केवळ वाकड येथील आउटलेटवरच उपलब्ध राहतील.
ग्राहकांना सोल डॅकच्या सोल-शैलीतील सॉसच्या विविध श्रेणींपैकी निवड करता येईल. यामध्ये गंजंग (सोया-गार्लिक), स्वीट अँड स्पायसी, हॉट अँड स्पायसी, कोरियन बीबीक्यू आणि व्होल्कॅनो यांचा समावेश आहे. कोरियन मसाल्यांची अस्सल चव अनुभवण्यासाठी सॉसशिवाय चिकन घेण्याचाही पर्याय उपलब्ध आहे.

“वाकडमधील हे नवे क्यूएसआर आमच्या पुणे प्रवासातील एक महत्त्वाचे पाऊल आहे,” असे सोल डॅकचे संस्थापक शॉन ली म्हणाले. “या नव्या ऑफरमुळे कोरियन जेवणाबद्दल उत्सुकता असलेल्या तसेच नवे स्वाद अनुभवू इच्छिणाऱ्या अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी आम्हाला मिळेल,” असेही त्यांनी नमूद केले.
“‘डॅक डे’च्या निमित्ताने आम्ही पुणेकरांना कोरियन फ्राइड चिकन त्याच्या सर्वात सोप्या आणि अस्सल स्वरूपात चाखण्यासाठी आमंत्रित करत आहोत,” असेही त्यांनी सांगितले.
फ्राइड चिकनसोबतच या नव्या क्यूएसआरमध्ये कोरियन स्ट्रीट फूडमधील लोकप्रिय पदार्थ—चीज कॉर्न डॉग्स, ट्तोकबोक्की, रापोक्की, रामेन, विविध पेये तसेच कोरियन गोड पदार्थ—उपलब्ध आहेत. आउटलेटची रचना सोल डॅकच्या स्ट्रीट-प्रेरित डिझाइन शैलीत साकारली असून, सोलच्या फूड स्ट्रीट्सपासून प्रेरित आकर्षक साइनज आणि ग्राफिक्स येथे पाहायला मिळतात. उत्साही व सहज वावरता येईल अशी ही रचना ब्रँडचा स्वाद-केंद्रित अनुभवावरचा भर अधोरेखित करते.
मुंबई आणि बंगळूरू येथील यशस्वी पदार्पणानंतर पुणे येथेही सोल डॅकने आपला विस्तार वेगाने सुरू ठेवला आहे. शहरी भागांमध्ये क्यूएसआर फॉरमॅटद्वारे विस्तार करत भारतातील अधिकाधिक शहरांपर्यंत अस्सल कोरियन स्ट्रीट फूडची चव पोहोचवण्याचा ब्रँडचा प्रयत्न आहे.









