Pune Grand Tour 2026 : पुणे ग्रँड टूर उद्या बंडगार्डन येथून सुरु होणार; जाणून घ्या, बंद मार्ग अन् पर्यायी मार्ग; खडकवासला-किरकटवाडी, किरकटवाडी ते नांदेड सिटी मार्गांचा समावेश

Pune Grand Tour 2026

पुणे : बजाज पुणे ग्रँड टूर स्टेज २ सायकल स्पर्धा उद्या ( दि.२१) शहरात लेडीज क्लब, ब्ल्यू नाईन चौक, बंडगार्डन येथून सुरु होणार आहे. ही स्पर्धा लष्कर, वानवडी व कोंढवा मार्गे पुणे ग्रामीण हददीमध्ये जाणार असून, स्पर्धेचा शेवट नांदेड सिटी येथे होणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक दुपारी १२ ते ४ दरम्यान आवश्यकतेप्रमाणे बंद करण्यात येणार आहेत. मात्र , कोणताही रस्ता हा ३० मिनिटा पेक्षा अधिक वेळ बंद राहणार नाही (स्पर्धेचा स्टार्ट व शेवट वगळून) अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली आहे.

स्पर्धेचा सुरुवात पॉईंट लेडीज क्लब, ब्ल्यू नाईन चौक, बंडगार्डन येथे असून, किराड चौक ते लेडीज क्लब पर्यंतचा रस्ता सकाळी ९ वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. स्पर्धेचा शेवट नांदेड सिटी मेन गेट येथे होणार आहे. त्यामुळे सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी मेनगेट समोरील मार्ग हा स्पर्धेचा कार्यक्रम संपपर्यंत बंद राहणार आहे. नागरिकांनी स्पर्धा मार्गावर कोणतेही वाहन उभे करु नये. स्पर्धा पाहण्यासाठी येणा-या नागरिकांनी रस्त्याच्या कडेला लावलेल्या बॅरिकेटस व स्टॉप लाईनच्या पाठीमागे थांबून स्पर्धेचा आनंद घ्यावा असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.

रस्ते – बंद मार्ग आणि पर्यायी मार्ग 

* रस्ते – लेडीज क्लब (सुरुवात)

बंद मार्ग – ब्ल्यू नाईल हॉटेल परिसर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक
पर्यायी मार्ग – कोयाजी रोड मार्गे एम.जी रोड मार्ग

* डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक ते गोळीबार मैदान चौक

बंद मार्ग- आंबेडकर पुतळा चौक ते खाण्या मारुती चौक ते गोळीबार गोळीबार मैदान चौक
पर्यायी मार्ग-  भैरोबा नाला दुल्हा नगर चौक गंगाधाम चौक मार्गे धोबीघाट चौक डायस डायस प्लॉट चौक व गिरीधर भवन चौकातून गोळीबार मैदान चौकाकडे येणारी वाहतूक बंद राहील वाहतूक सेवन वखार महामंडळ चौक गंगाधाम चौक मार्गे जाईल

 गोळीबार मैदान चौक ते शितल पेट्रोल पंप चौक

बंद मार्ग गोळीबार मैदान चौक ते मुल्ला नगर चौक ते ज्योती हॉटेल चौक ते शितल पेट्रोल पंप
पर्यायी मार्ग- 1) मंमादेवी चौक भैरोबा नाला मुल्ला नगर गंगाधाम सेवन लॉज

२) शितल पेट्रोल पंप कौसर बाग गंगा सॅटॅलाइट सोसायटी नेताजी नगर लुल्ला नगर मार्गे

३) सेवन लावून गंगाधाम लुल्ला नगर चौक मार्गे

* शितल पेट्रोल पंप ते खडीमिशन चौक

बंद मार्ग- शितल पेट्रोल पंप ते खडी मिशन चौक
पर्यायी मार्ग – काना हॉटेल मिठा नगर आई माता मंदिर गंगाधाम चौक लुल्ला नगर मार्ग, मंतरवाडी करून येणाऱ्या वाहनांकरता कान्हा हॉटेल गंगाधाम चौक लुल्ला नगर चौक भैरोबा नाला चौक

* खडीमिशन चौक ते ट्रिनिटी कॉलेज ते बोपदेवघाट

बंद मार्ग – खडीमेशन चौक ते येवलेवाडी ते बोपदेवघाट
पर्यायी मार्ग – श्रीराम चौक येवलेवाडी पर्यंत धर्मावत पेट्रोल पंप येवलेवाडी पर्यंत हडपसर सासवड बोपदेव घाट कात्रज शिंदेवाडी बोपदेव घाट

* खडकवासला तर किरकटवाडी

बंद मार्ग – खडकवासला ते सिंहगड रोड ते किरकटवाडी
पर्यायी मार्ग – पानशेत रोड मार्गे

* किरकटवाडी ते नांदेड सिटी
बंद मार्ग -किरकटवाडी ते नांदेड सिटी
पर्यायी मार्ग – एमडीए लिंक रोड ते एनडीए शिवणे रोड मार्गे, डीएसके विश्व वडगाव धायरी

* नांदेड सिटी गेट
बंद मार्ग – वारजे ब्रिज ते नांदेड सिटी

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील सर्व सरकारी व खाजगी शाळांना आज सुट्टी

पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकलिंग स्पर्धेच्या मार्गावर असलेल्या लेडीज क्लब पुणे इस्ट ट्रीस्ट रोडने खाण्या मारुती चौक – पुलगेट सोलापूर बाजार चौकी गोळीबार मैदान, लुल्ला नगर चौक -ज्योती हॉटेल चौक खडी मशीन चौक- येवलेवाडी बोपदेव घाट मार्गे जाणार आहे. त्यामुळे या रस्त्यांच्या परिसरातील सरकारी व खाजगी शाळा मधील विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील सर्व सरकारी व खाजगी शाळांना उद्या ( दि.21) सुट्टी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.