शाओमी इंडियाने आज रेडमी १५ सी ५जी लॉन्च केल्याचे जाहीर केले. हा असा स्मार्टफोन आहे जो आकर्षकरित्या स्लीक असून त्यात १७. ५३ सेंमीचा मोहक डिस्प्ले आणि दिवसभर विश्वसनीय परफॉर्मन्स देण्याची क्षमता आहे, त्यामुळे काम आणि मनोरंजन यासाठी आलटून पालटून फोन वापरणाऱ्यांसाठी तो आदर्श आहे.
सदर लॉन्चविषयी बोलताना शाओमी इंडियाचे चीफ मार्केटिंग ऑफिसर श्री. अनुज शर्मा म्हणाले, “रेडमी १५ सी ५ जी सादर करताना दैनंदिन वापरासाठी खूप सुलभता देईल असा फोन बनवून यूझरच्या हाती देण्याचे आमचे ध्येय होते. मोठा मोहक डिस्प्ले, विश्वसनीय, दिवसभर चालणारी बॅटरी आणि नेटकी रॉयल डिझाईन यांचे मिश्रण असलेला हा फोन काम करण्यासाठी, काही शिकण्यासाठी किंवा काही बघण्यासाठी खूप अनुकूल आहे. यापुढेही रेडमीचा अनुभव विश्वसनीय ठेवण्यावर आणि आमच्या यूझर्सच्या गरजेनुसार फोनचे डिझाईन करण्यावर आमचा फोकस असणार आहे.”
रेडमी १५ सी ५ जी मध्ये स्लिम आणि पॉलिश्ड बॉडी आहे, ज्यात चांगल्या ग्रिपसाठी ३ डी क्वाड-कर्व्ह्ड बॅक आणि एक अनोखा फ्लोटिंग क्रेटर कॅमेरा डिझाईन आहे. हा फोन मूनलाइट ब्लू, डस्क पर्पल आणि मिडनाइट ब्लॅक या रंगांमध्ये उपलब्ध असून मूनलाइट ब्लू हा दुहेरी रंगाच्या मॅग्नेटिक इंक प्रक्रियेने तयार करण्यात आला आहे.
१२० हर्टज पर्यंत अॅडाप्टिव्हसिंकसह १७. ५३ सेंमी एचडी प्लस डिस्प्ले स्मूद आणि प्रतिसादक्षम व्ह्यूइंग देते, तर ५० एमपी एआय ड्युअल कॅमेरा तीव्र प्रकाशात, इनडोर किंवा कमी उजेड असतानाही स्पष्ट, चमकदार फोटोग्राफी सुनिश्चित करतो.
६००० एमएएचची ची मोठी बॅटरी या उपकरणाला दीर्घकाळ वापरासाठी आवश्यक असलेली ऊर्जा पुरवते. ज्यामुळे २३ तास व्हिडिओ प्लेबॅक आणि १०६. ९ तासांचे संगीत शक्य होते. ३३ वॉट टर्बो चार्जिंगसह, केवळ २८ मिनिटांत हा फोन ५० टक्के चार्ज होतो. आणि रिव्हर्स चार्जिंग प्रवासात अतिरिक्त सुविधा प्रदान करते. याच्या बॉक्समध्ये ३३ वॉट चार्जर देखील मिळतो.
मीडियाटेक डायमेन्सिटी ६३०० ऑक्टा-कोर प्रोसेसरवर चालणारा रेडमी १५ सी ५ जी स्मूद मल्टीटास्किंग प्रदान करतो. यामध्ये १६ जीबी पर्यंत रॅम (मेमरी एक्सटेन्शनसह) आणि १ टीबी एक्सपांडेबल स्टोरेज मिळते. तो शाओमी हायपर ओएस २ वर चालतो आणि स्मार्ट फीचर्स प्रदान करतो, जशी की गूगल सह सर्कल टू सर्च, बिल्ट-इन गूगल जेमिनी आणि कॉल सिंक व शेअर्ड क्लिपबोर्डसहित शाओमी इंटरकनेक्टिव्हिटी टूल्स.
दैनंदिन टिकाऊपणासाठी बनवलेल्या या उपकरणात आयपी ६४ डस्ट आणि वॉटर रेझिस्टन्स आहे. गोंगाट असलेल्या वातावरणात स्पष्ट ऐकू येण्यासाठी २०० टक्के व्हॉल्यूम बूस्ट आहे.
रेडमी १५ सी ५ जी ४ जीबी +१२८ जीबी व्हेरिएंटची किंमत रु. १२,४९९ व , ६ जीबी + १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत रु. १३,९९९ आणि ८ जीबी + १२८ जीबी या व्हेरिएंटची किंमत रु. १५,४९९ अशी ठेवण्यात आली आहे.








