सिंहगड कुस्ती संकुलाच्या मल्लांची कुमार महाराष्ट्र केसरीसाठी निवड

By: Editor_Pratik

On: Friday, December 19, 2025 4:45 AM

Google News
Follow Us

विशाल भालेराव

सिंहगड : राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने १७ वर्षांखालील गटासाठी फ्रीस्टाईल व ग्रीको-रोमन प्रकारातील राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा २०२५-२६ साठी घेण्यात आलेल्या पुणे शहर संघाच्या निवड चाचणी स्पर्धेत सिंहगड कुस्ती संकुलाच्या मल्लांनी उल्लेखनीय यश संपादन केले.

४५ किलो वजन गटात पै. स्वराज समीर वाल्हेकर यांनी फ्रीस्टाईल प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला. त्याचप्रमाणे याच वजन गटात पै. समर्थ सचिन वाल्हेकर यांनी ग्रीको-रोमन प्रकारात अव्वल स्थान मिळवले. या कामगिरीमुळे दोन्ही मल्लांची संभाजीनगर येथे होणाऱ्या कुमार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या यशाबद्दल माजी सरपंच शरद लाला जावकर यांनी मल्लांचे विशेष कौतुक केले.

“सिंहगड कुस्ती संकुलातील मल्ल मेहनत, शिस्त आणि सातत्याच्या जोरावर मोठी भरारी घेत आहेत. स्वराज व समर्थ यांनी मिळवलेले यश हे परिसरासाठी अभिमानास्पद आहे. अशाच जिद्दीने खेळत राहून त्यांनी राज्य व देश पातळीवर नावलौकिक मिळवावा,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

या यशामुळे सिंहगड कुस्ती संकुलातील वस्ताद, सहकारी मल्ल, क्रीडाप्रेमी तसेच पालकांकडून दोन्ही मल्लांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now