पुणे प्रहारच्या वाचकांनो इकडे लक्ष द्या : राजाराम पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू; रात्रीच्या वेळेत एक लेन राहणार बंद

By: Editor_Pratik

On: Saturday, December 27, 2025 2:10 PM

Google News
Follow Us

पुणे : सिंहगड रस्त्यावरील कर्वेनगर आणि सिंहगड रोडला जोडणाऱ्या राजाराम पूल दुरुस्तीच्या कामाला आजपासून सुरुवात होत आहे. ही दुरुस्ती २६ डिसेंबर ते १७ जानेवारी या कालावधीत केली जाणार असून, या काळात पुलाची एक लेन रात्रीच्या वेळेत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

महापालिकेच्या प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता दिनकर गोजारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुरुस्तीचे काम रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत चालणार आहे. या कालावधीत पुलाची एक लेन बंद राहील, मात्र दुसरी लेन सुरू ठेवण्यात येणार आहे. दुरुस्तीचे काम फक्त रात्री करण्यात येणार असल्याने दिवसा दोन्ही लेन वाहतुकीसाठी खुल्या राहणार आहेत. त्यामुळे दिवसा वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राजाराम पूल हा सिंहगड रोड आणि कर्वेनगर परिसरासाठी महत्त्वाचा दुवा असून, येथे दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलामुळे वाहतुकीचा ताण काही प्रमाणात कमी झाला असला, तरी दिवसा पूल बंद केल्यास पुन्हा कोंडी वाढण्याची शक्यता असल्याने रात्रीच दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.

वाहनचालकांनी या कालावधीत रात्री प्रवास करताना पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहनही महापालिकेकडून करण्यात आले आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

October 12, 2026

October 12, 2026

October 12, 2026

October 11, 2026

October 9, 2026

October 9, 2026