‘‘आम्ही फक्त पक्षाचेच काम करायचं का’’; प्रभाग क्रमांक ३३ सह सर्वत्र भाजपच्या इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी; अनेक प्रभागात बंडखोरीची दाट शक्यता

By: Editor_Pratik

On: Sunday, December 28, 2025 2:35 PM

Pune Bjp
Google News
Follow Us

पुणे : प्रभाग क्रमांक 33 मध्ये आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीमध्ये (भाजप) अंतर्गत नाराजी वाढताना दिसत आहे. उमेदवारीबाबत अंतिम नावे जवळपास निश्चित झाल्याची चर्चा सुरू असून, यामुळे अनेक इच्छुक कार्यकर्ते आणि नेते अस्वस्थ झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून पक्षसंघटना वाढवण्यासाठी सातत्याने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक दिली जात असल्याची भावना उघडपणे व्यक्त होत आहे.

प्रभागातील काही इच्छुकांचे म्हणणे आहे की, पक्षासाठी निवडणूक काळातच नव्हे तर सामान्य काळातही अहोरात्र काम केले. जनतेशी संपर्क, संघटन बांधणी, आंदोलन आणि प्रचारात सक्रिय सहभाग असूनही उमेदवारीच्या शर्यतीत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे, इतर पक्षांकडून अशा कार्यकर्त्यांची दखल घेतली जात असताना, स्वतःच्या पक्षाकडून अपेक्षित सन्मान न मिळणे ही बाब नाराजी अधिक तीव्र करणारी ठरत आहे.

“जर पक्षात प्रामाणिक काम करणाऱ्यांना न्याय मिळत नसेल, तर वेगळा निर्णय घेण्याचा विचार करावा लागेल,” असा सूचक इशारा काही इच्छुकांनी दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 33 इतर प्रभागातही बंडखोरीची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, पक्ष नेतृत्वाकडून नाराजांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही सांगितले जात आहे.

संवाद, समन्वय आणि योग्य तो सन्मान देत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र अंतिम उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतरच खरी परिस्थिती स्पष्ट होणार आहे.
एकंदरीत, प्रभाग क्रमांक 33 मध्ये भारतीय जनता पार्टी साठी ही स्थिती आव्हानात्मक ठरत असून, येत्या काही दिवसांत घडणाऱ्या राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now