MNS-Shivsena Alliance : ऐतिहासिक क्षण! २० वर्षांनंतर राज-उद्धव ठाकरे एकत्र, मनसे-शिवसेना युतीची अधिकृत घोषणा
महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक क्षण आज पाहायला मिळाला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत आज युतीची अधिकृत घोषणा केली. तब्बल २० वर्षांनंतर दोन्ही ठाकरे कुटुंब आणि दोन संघटना एकत्र आल्या. ठाकरे बंधुंनी युतीची घोषणा करताच दोन्ही पक्षाच्या नेत्यांपासून ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
मुंबईतील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये राज- ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन आज युतीची घोषणा केली. यावेळी मंचावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या बाजूच्या खुर्चीवर संजय राऊत बसले होते. युतीची घोषणा केल्यानंतर ठाकरे कुटुंबीयांनी एकत्रित येत फोटो देखील काढले. हा आनंदचा क्षण पाहून पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांच्या डोळ्यात अश्रू आले. युतीची घोषणा होताच शिवसेना-मनसे कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची एकत्रित पत्रकार परिषद घेण्यापूर्वी दादरच्या शिवाजीपार्क येथील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर जाऊन दर्शन घेतले. संपूर्ण ठाकरे कुटुंब यावेळी उपस्थित होते. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यावेळी उपस्थित होत्या. ठाकरे बंधूंना आणि कुटुंबीयांना एकत्रित पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले. ठाकरे बंधूं युतीची घोषणा केल्यानंतर शिवसैनिक आणि मनसे कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करत आनंद व्यक्त केला.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची एकत्रित पत्रकार परिषद घेण्यापूर्वी दादरच्या शिवाजीपार्क येथील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर जाऊन दर्शन घेतले. संपूर्ण ठाकरे कुटुंब यावेळी उपस्थित होते. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यावेळी उपस्थित होत्या. ठाकरे बंधूंना आणि कुटुंबीयांना एकत्रित पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले. ठाकरे बंधूं युतीची घोषणा केल्यानंतर शिवसैनिक आणि मनसे कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करत आनंद व्यक्त केला.
दोन दशकानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. मुंबई, नाशिकसह काही महत्त्वाच्या महापालिकेत शिवसेना-मनसे एकत्र लढणार आहेत. मनसे-शिवसेना युतीवर आज अधिकृत शिक्कामोर्तब झाले. पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी जागा वाटपावर मिष्कील वक्तव्य केले.
कोण किती जागा लढवणार, आकडा काय.. हे आम्ही तुम्हाला सांगणार नाही, असे म्हणत राज ठाकरेंनी त्याचे कारणही सांगितले. ते म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुले पळवणाऱ्या टोळ्या फिरताता. त्यामध्ये दोन राजकीय टोळ्यांची भर पडली.ते राजकीय पक्षातील मुले , उमेदवाराला पळवातात. असा टोला राज ठाकरेंनी लगावला. निवडणुका लढवणाऱ्या सर्व उमेदवाराला दोन्ही पक्षाकडून उमेदवारी दिली जाईल. अर्ज कधी भरायचे ते आपल्याला कळवले जाईल, असे राज ठाकरे म्हणाले.
अखेर राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय सुरू केला आहे. मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या महापालिकेसाठी ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केली. यावेळी राज ठाकरेंनी सत्ताधारी महायुतीवर जोरदार टीका केली. महाराष्ट्रात पोरं पळवणारी टोळी आली आहे, हे राजकीय नेत्यांना पळवतात, असा टोला राज ठाकरेंनी भाजप अन् शिंदेंच्या (Raj Thackeray–Uddhav Thackeray Alliance Announced) नेत्यांना लगावला. दरम्यान, ज्यांचं मुंबई-महाराष्ट्रावर प्रेम आहे, त्या पत्रकार बांधवांनी आणि इतरांनी आमच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन यावेळी राज ठाकरेंनी केले. बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशी राज आणि उद्धव यांची संयुक्त पत्रकार परिषद आज हॉटेलमध्ये पार पडली. (Shiv Sena(UBT) and MNS announce alliance ahead of Municipal Corporation elections)
कोण किती जागा लढवणार, आकडा काय.. हे आम्ही तुम्हाला आताच सांगणार नाही. कारण, महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुले पळवणाऱ्या टोळ्या फिरत आहेत. त्यामध्ये दोन राजकीय टोळ्यांची भर पडली आहे. ते राजकीय पक्षातील मुले (उमेदवार-नेते) पळवतात, असा टोला राज ठाकरेंनी लगावला.
निवडणुका लढवणाऱ्या सर्व उमेदवाराला दोन्ही पक्षाकडून उमेदवारी दिली जाते. कधी भरायची ते आपल्याला कळवले जाईल. शिवसेना आणि मनसेची युती झाली, हे आज मी जाहीर करतो, असे राज ठाकरे म्हणाले.
१८ वर्षानंतर राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र आले. पण या युतीचा पाया कुठे रचला, याचा अनेकजण विचार करत असतील. पण याचे उत्तर स्वत: राज ठाकरेंनी यावेळी दिले. महेश मांजरेकर यांना एक मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, महाराष्ट्रासाठी, मराठीसाठी वाद विसरून एकत्र यायला हवं, असे म्हटले होते. तेथूनच आम्ही एकत्र येण्याची सुरूवात झाली, असे राज ठाकरेंनी सांगितले.
मी सगळ्या मराठी जनांना सूचना करतोय. आता जर चुकाल, तर संपाल. आता फुटाल, तर पूर्णपणे संपून जाल.. त्यामुळे तुटू नका, फुटू नका, मराठीचा वसा टाकू नका. मराठी माणूस सहसा कुणाच्या वाटेला जात नाही. पण त्याच्या वाटेला जर कुणी आलाच, तर त्याला परत जाऊ देत नाही, असं उद्धव ठाकरेंनी मराठी माणसांना यावेळी आवाहन केले.









