धनराज जोरी यांची किल्ले सिंहगडावरून प्रचाराला सुरुवात; नरवीर तानाजींच्या शौर्याची प्रेरणा

By: Editor_Pratik

On: Saturday, December 27, 2025 3:34 PM

Google News
Follow Us

विशाल भालेराव

सिंहगड – किल्ले सिंहगडावर जाऊन नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्य, त्याग आणि कर्तव्यनिष्ठेपासून प्रेरणा घेत धनराज किसन बापू जोरी यांनी आपल्या प्रचाराची औपचारिक सुरुवात केली. तानाजी मालुसरे यांच्या जीवनमूल्यांचा—त्याग, निष्ठा आणि शौर्याचा—आदर्श समोर ठेवत समाजासाठी अधिक योगदान देण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

“इतिहासातील महान व्यक्तींच्या विचारांतूनच आजच्या समाजसेवेचा मार्ग मिळतो,” असे सांगत धनराज जोरी यांनी जनतेशी प्रामाणिकपणे जोडलेले नेतृत्व देण्याचा संकल्प व्यक्त केला. या वेळी सुदाम सुर्वे, मोहन भालेराव, विपुल जोरी यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

सिंहगड पंचक्रोशीतील विविध गावांना भेटी देत धनराज जोरी नागरिकांशी थेट संवाद साधत असून, स्थानिक प्रश्न, विकासाच्या अपेक्षा आणि लोकांच्या भावना जाणून घेत आहेत. त्यांच्या या प्रचाराला पंचक्रोशीतून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

October 12, 2026

October 12, 2026

October 12, 2026

October 11, 2026

October 9, 2026

October 9, 2026