भीषण अपघात : भिंतीच्या कठड्याला जोरदार धडक; कार ४० ते ५० फूट लांब जाऊन डिव्हायडरवर आदळली; कारच्या पुढील भागाचा चुरा, २ जणांचा जागीच मृत्यू

भीषण अपघात : भिंतीच्या कठड्याला जोरदार धडक; कार ४० ते ५० फूट लांब जाऊन डिव्हायडरवर आदळली; कारच्या पुढील भागाचा चुरा, २ जणांचा जागीच मृत्यू

मुंबई-नाशिक महामार्गावर भरधाव वेगाने जात असलेली वॅगनार कार अचानक अनियंत्रित होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. कारचा वेग जास्त असल्याने चालकाचा ताबा सुटला आणि कार रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षण भिंतीवर आदळून सुमारे ४० ते ५० फूट लांब जाऊन डिव्हायडरवर धडकली. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की कारचे एअरबॅग्स उघडले, मात्र प्रवाशांना गंभीर दुखापत झाली.

मृतांमध्ये मयुरेश विनोद चौधरी (२९, रा. तानसा) आणि जयेश किसन शेंडे (२५, रा. उंबरखाड) यांचा समावेश असून हर्षल पांडुरंग जाधव (२९, रा. पेंढरघोळ) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच शहापूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.

दरम्यान, चार दिवसांपूर्वीच माजिवडा परिसरात झालेल्या एका अपघातात कंटेनरने व्हॅनला धडक दिल्याने वाहतूक खोळंबली होती. त्या अपघातात जीवितहानी झाली नव्हती, मात्र महामार्गावरील वेग आणि वाहतूक सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.