पुणे मेट्रो अपडेट : नवीन मार्गांना मंजुरी, प्रवास जलद – १० मिनिटांत पार करणार दीड तासाचे अंतर

By: Editor_Manas

On: Thursday, November 27, 2025 6:07 AM

Google News
Follow Us

पुणे : पुणे मेट्रो विस्ताराला मोठी गती मिळाली असून दोन नवीन मार्गांना केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे. यामुळे शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होण्यास मदत होणार असून प्रवासाचा वेळ लक्षणीय घटणार आहे.
नवे मेट्रो मार्ग असे —

खडकवासला ते खराडी
नळस्टॉप ते वारजे-माणिकबाग

या दोन्ही मार्गांमुळे पूर्व-पश्चिम आणि दक्षिण-पश्चिम जोडणी मजबूत होणार आहे.
खडकवासला ते खराडी या प्रवासाला सध्या एक ते दीड तास लागतो, परंतु मेट्रो सुरू झाल्यानंतर हा प्रवास अवघ्या ४० मिनिटांत पूर्ण होणार आहे.
त्याचप्रमाणे नळस्टॉप ते वारजे प्रवास केवळ १० मिनिटांत शक्य होईल.

सुरू आणि प्रलंबित असलेल्या कामांना गती आवश्यक

सध्या खालील मेट्रो मार्ग कार्यरत किंवा प्रगतीपथावर आहेत :
चालू मार्ग – वनाझ ते रामवाडी, पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट
काम सुरू असलेला मार्ग – पिंपरी-चिंचवड ते निगडी
काम सुरू होणार – स्वारगेट ते कात्रज (निविदा प्रक्रिया व वर्क ऑर्डर पूर्ण)
पूर्वीच मंजूर झालेले – वनाझ ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली

केंद्राने यंदा मंजूर केलेले मार्ग :
खडकवासला – खराडी
नळस्टॉप – वारजे माणिकबाग

सध्याची दैनंदिन मेट्रो प्रवासी संख्या – २ लाख ३० हजार

शहराच्या वाहतुकीला मोठा दिलासा

नवीन मार्ग सुरू झाल्यानंतर —
▪ सिंहगड रोड परिसरातून थेट खराडीपर्यंत मेट्रोतून प्रवास शक्य
माणिकबाग-वारजे मार्गामुळे कोथरूडशी सुलभ जोडणी
▪ शहराच्या मध्यवर्ती भागांतील वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता

स्वारगेट–कात्रज भुयारी मार्ग आणि रामवाडी–वाघोली डबल डेकर मार्गाची कामे अद्याप रखडलेली आहेत. त्यामुळे फक्त मंजुरी पुरेशी नाही; कामांना तातडीने वेग देणे आवश्यक असल्याचे नागरिक आणि तज्ज्ञांचे मत आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026