Ladki Bahin Yojana : उरले शेवटचे काही दिवस! लाडक्या बहिणींनो लगेच eKYC करा, अन्यथा मिळणार नाहीत ₹१५००; स्टेप बाय स्टेप प्रोसेस

लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना आता ई केवायसी करणे अनिवार्य केले आहे. तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने केवायसी करायचे आहे. ज्या महिला केवायसी करणार नाहीत त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी दोन महिन्याचा कालावधीदेखील दिला होता. १८ सप्टेंबरपासून ही प्रक्रिया सुरु झाली आहे. १८ नोव्हेंबरपर्यंत ही केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन आदिती तटकरेंनी केले आहे.

आता ई केवायसीसाठी फक्त १८ दिवस उरले आहेत.त्यामुळे महिलांना केवायसी करायची आहे.त्यामुळे अजूनही कोणी केवायसी केली नसेल तर लगेच करा. दरम्यान, केवायसीची प्रोसेस आता अधिक सोपी आणि सिंपल केली आहे. दररोज लखो महिला केवायसी करतात. आतापर्यंत कोट्यवधी महिलांनी केवायसी केली असल्याची माहिती स्वतः मंत्री आदिती तटकरेंनी दिली आहे.

लाडकी बहीण योजना केवायसी प्रोसेस (Ladki Bahin Yojana KYC Process)

सर्वात आधी https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जा.

यानंतर e-KYC वर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल.

यानंतर तुमची केवायसी पूर्ण झाली की नाही हे समजेल.

जर केवायसी पूर्ण झाली नसेल तर पुढील प्रोसेस सुरु होईल.

यानंतर लाभार्थ्यांना पती किंवा वडिलांचा आधार कार्ड नंबर निवडायचा आहे. यानंतर तुम्हाला ओटीपी येईल.

यानंतर खाली तुम्हाला जात प्रवर्ग निवडावा लागेल. यानंतर Declaration वर क्लिक करावे लागेल.

यानंतर काही प्रश्न विचारले जातील त्याची योग्य माहिती द्यायची आहे.

यानंतर तुम्हाला Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा मेसेज येईल. यानंतर तुम्ही केवायसी पूर्ण होईल.