Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, ऑक्टोबरचे 1500 रुपये उद्यापासून बँक खात्यात येणार, आदिती तटकरेंची घोषणा

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, ऑक्टोबरचे 1500 रुपये उद्यापासून बँक खात्यात येणार, आदिती तटकरेंची घोषणा

मुंबई : राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता उद्यापासून वितरित केला जाणार आहे. १५०० रुपयांच्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या पात्र महिलांना यामुळे दिलासा मिळणार आहे. याबाबतची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

पुणेकरांसाठी खास सुविधा! खडकवासला–स्वारगेट–खराडी मार्गावर धावणार स्वयंचलित मेट्रो

ऑक्टोबर हप्ता सुरू

आदिती तटकरे यांनी एक्सवरून पोस्ट करत सांगितले की,
“महिला सक्षमीकरणाचा हा अखंड प्रवास अधिक सक्षम करण्यासाठी ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी उद्यापासून वितरित होत आहे. लवकरच सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधारशी संलग्न बँक खात्यांमध्ये रक्कम जमा होईल,” असे त्यांनी म्हटले.

E-KYC पूर्ण करण्याचे आवाहन

योजनेचा लाभ सातत्याने मिळावा यासाठी सर्व लाभार्थींना E-KYC अनिवार्य करण्यात आली आहे.
यासाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सोय उपलब्ध असून, 18 नोव्हेंबरपूर्वी E-KYC पूर्ण करण्याचे आवाहन तटकरे यांनी केले आहे.

E-KYC करताना

  • लाभार्थी महिलेचा आधार क्रमांक

  • पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक
    देणे आवश्यक आहे.

योजनेची वैशिष्ट्ये

  • योजना जुलै 2024 मध्ये सुरू

  • पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये सन्मान निधी

  • नमो शेतकरी महासन्मान व पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या शेतकरी महिलांना दरमहा 500 रुपये

राज्यातील महिलांचा सक्षमीकरणाचा प्रवास अधिक वेगाने पुढे न्यावा, हा योजनेमागचा उद्देश असल्याचेही तटकरे यांनी स्पष्ट केले.