गर्लफ्रेंड घरात एकटी, बॉयफ्रेंड खोलीत शिरला; भावांनी पकडले आणि चोप देत हत्या – छत्तीसगडमध्ये धक्कादायक प्रकार

By: Editor_Pratik

On: Saturday, November 1, 2025 11:10 AM

Google News
Follow Us

छत्तीसगड | दुर्ग

दुर्ग जिल्ह्यातील भिलाई परिसरात प्रेमप्रकरणातून एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरात गेलेल्या तरुणाला भावांनी रंगेहात पकडले आणि बेदम मारहाण केली. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

मृत तरुणाचे नाव धीरज सरोज उर्फ विक्की (वय २५) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धीरजचा त्याच भागातील एका तरुणीशी प्रेमसंबंध होता. घटनेच्या दिवशी तरुणीची आई घराबाहेर गेली होती, तर भाऊ सूरज कामावर गेला होता. या काळात धीरज प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचला.

काही वेळातच सूरज अनपेक्षितपणे घरी परतला आणि बहिणीसोबत धीरजला पाहून तो संतापला. त्याने चुलत भावांना बोलावून घेतले. सर्वांनी मिळून घराचा दरवाजा बंद केला आणि धीरजला बेदम मारहाण केली. डोक्यावर गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

मृतकाची आई शोभा यांनी आरोप केला की, “तरुणीनं मुलाला घरी बोलावलं आणि नंतर तिच्या भावांनी मिळून धीरजची हत्या केली.” त्या जेव्हा घरी पोहोचल्या तेव्हा धीरज रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता, असेही त्यांनी सांगितले.

या प्रकरणाबाबत पोलिस अधिकारी हेम प्रकाश नायक म्हणाले, “धीरजची निर्दयपणे हत्या करण्यात आली आहे. पाच संशयितांचा सहभाग असून, त्यातील तिघांना अटक करण्यात आली आहे. दोघे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. मुलीच्या भावांनी केलेल्या हल्ल्यात धीरजचा मृत्यू झाला.” या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पुढील तपास सुरू आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

October 13, 2026

October 13, 2026

October 13, 2026

October 13, 2026

October 12, 2026

October 12, 2026