‘हलाल’ प्रमाणित ‘मेंटोस’ गोळ्या हिंदुत्वनिष्ठांनी कोल्हापुरातील दुकानातून हटवल्या !

 

दिवाळीच्या निमित्ताने संदेश देताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मा. योगी आदित्यनाथ यांनी हलाल प्रमाणित उत्पादने आतंकवादी कारवायांना आर्थिक पाठबळ देत असल्याने त्या हलाल उत्पादनांवर बंदी घालण्याबाबत विधान केले होते. त्यानंतर आज कोल्हापूर शहरातील ‘येवलेज मिल्क कॉर्नर’ या दुकानात मुस्लिमबहुल देश इंडोनेशिया येथून आयात केलेल्या आणि ‘हलाल प्रमाणपत्र’ असलेल्या ‘मेंटोस’ गोळ्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या.

ही माहिती मिळताच हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी तत्काळ संबंधित दुकानदाराची भेट घेतली आणि त्यांना ‘हलाल प्रमाणपत्र’ ही पद्धत भारतीय समाजासाठी कशी घातक आहे तसेच त्यातून मिळणारा निधी अप्रत्यक्षपणे देशविरोधी कारवायांसाठी कसा वापरला जातो, हे समजावून सांगितले.

हे ऐकल्यानंतर दुकानदाराने तात्काळ ‘हलाल प्रमाणित मेंटोस’ गोळ्या दुकानातून हटवल्या आणि पुढे कोणत्याही ‘हलाल प्रमाणपत्र’ असलेल्या वस्तू विक्रीस ठेवणार नसल्याचे आश्वासन दिले. या येवलेज मिल्क कॉर्नरचा आदर्श घेऊन इतर राष्ट्रप्रेमी दुकानदारांनीही आपापल्या दुकानातील हलाल उत्पादनंवर बहिष्कार घातला पाहिजे, असे आवाहन या निमित्ताने करण्यात आले.

या प्रबोधन मोहिमेत हिंदु जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, महेंद्र अहिरे, प्रीतम पवार, विश्वास पाटील तसेच महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सचिन भोसले आणि अशोक गुरव आदी उपस्थित होते.