हातीव (मोर्डे) पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा १४ सप्टेंबर रोजी वांझोळे येथे मेळावा

संगमेश्वर/ प्रतिनिधी: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या धामधूमीला लवकरच सुरूवात होणार आहे. या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिपळूण-संगमेश्वरचे लोकप्रिय आमदार शेखर निकम हे आत्तापासूनच अँक्शन मोडवर आले आहेत. ते पंचायत समिती गणनिहाय मेळावे घेवून राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नवी ऊर्जा निर्माण करणार आहेत. संगमेश्वर तालुक्यातील हातीव (मोर्डे) पंचायत समिती गणात रविवार दि. १४ सप्टेंबर रोजी वांझोळे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात आमदार शेखर निकम हे मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रत्येक पंचायत समिती गणात वातावरण निर्मिती करण्यावर भर असणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चिपळूणसह संगमेश्वर तालुक्यात यश मिळवून देण्यासाठी आमदार शेखर निकम हे आत्तापासूनच कामाला लागले आहेत. यासाठी पंचायत समिती गणनिहाय पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा घेण्याचे त्यांचे प्रयोजन आहे. याचाच भाग म्हणून हातीव (मोर्डे) पंचायत समिती गणातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा मेळावा दि. १४ सप्टेंबर रोजी वांझोळे भोईवाडी येथील श्री. बाळू शेडगे व श्री. भाऊ शेडगे यांच्या निवासस्थानी सकाळी ११ वा. आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात लोकप्रिय आमदार मा. श्री. शेखरजी निकम सर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. या मेळाव्याला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, या मेळाव्याद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीनिशी लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.