एचआयव्ही (ह्यूमन इम्यूनोडेफिशिएन्सी व्हायरस-एड्स) सारख्या दुर्धर आजारावरील औषध आता भारतात सर्वात स्वस्त दरात मिळणार आहे. अमेरिकेत ज्याची किंमत तब्बल ₹३५ लाख आहे, ते औषध भारतात केवळ ₹३,३०० मध्ये उपलब्ध होणार आहे.
गरीब आणि विकसनशील देशांना मोठा फायदा
या औषधामुळे सर्वात जास्त लाभ विकसनशील आणि गरीब देशांतील रुग्णांना होणार आहे. महागड्या ब्रँडेड औषधांमुळे उपचार घेणे कठीण झाले होते; मात्र भारताच्या या पावलामुळे हजारो रुग्णांना नवे जीवन मिळेल.
जेनेरिक व्हर्जनमुळे किंमत घसरली
अमेरिका, कॅनडा, युरोप आणि ऑस्ट्रेलियात आधीपासूनच उपलब्ध असलेल्या ब्रँडेड औषधाचे भारतात जेनेरिक व्हर्जन तयार करण्यात आले आहे. त्यामुळे किंमत मोठ्या प्रमाणात कमी झाली असून औषध सर्वसामान्यांसाठी परवडणारे ठरणार आहे.
कधी येणार बाजारात?
आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार हे स्वस्त औषध सन २०२७ पासून बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल. त्यामुळे एड्सविरोधातील जागतिक लढाईला नवे बळ मिळेल.
भारतातील एचआयव्हीची आकडेवारी
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात सध्या २५.४ लाख लोक एचआयव्हीग्रस्त आहेत. दरवर्षी सुमारे ६८ हजार नवीन रुग्ण नोंदवले जातात, तर २०२३-२४ मध्ये जवळपास ३५,८७० जणांचा मृत्यू एचआयव्हीशी संबंधित आजारांमुळे झाला. यावरून हे औषध भारतासाठी किती महत्त्वाचे आहे हे स्पष्ट होते.