Maharashtra Heavy Rain Update : मुसळधार पावसाचा फटका! जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, शाळा- कॉलेज बंद, पण कुठे?

Maharashtra rain update: Heavy rainfall lashes Raigad : महाराष्ट्रात सध्या मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल आहे. अशातच पुढचे दोन दिवस रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, पुणे आणि सातारा यासह अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे काही जिल्ह्यात शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे निर्देश संबंधित प्रशासनकडून घेण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमामात अतिवृष्टी सुरु आहे. उद्यादेखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर पनवेल महानगर पालिका हद्दीतील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये, आश्रम शाळा, व्यवसाय आणि प्रशिक्षण केंद्र यांना उद्या २० ऑगस्ट रोजी सु्ट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Rain Update : पावसाचा कहर, पुढील १० तास धोक्याचे; लोकल सेवा विस्कळीत, विमान उड्डाणांवर परिणाम, शाळा- महाविद्यालयांना सुट्टी

याशिवाय लोणावळ्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. लोकांच्या सुरक्षिततेचा विचार करता लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी शहरातील सर्व शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे.

पुढचे २ दिवस लोणावळ्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नगर परिषद आणि स्थानिक प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

School Closed : शाळांना सुट्टी, गाव-खेड्यातल्या शाळांचं काय होणार? मोठी अपडेट समोर!

सातारा जिल्ह्यातील ६ तालुक्यातील शाळांनाही दोन दिवस सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे २० आणि २१ ऑगस्ट रोजी शाळा बंद राहणार आहेत. हवामान विभागाने सातारा जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच पाटण, जावळी, वाई, महाबळेश्वर, कराड तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान, राज्यातील इतर ठिकाणची परिस्थिती बघता तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांकडून सुट्टीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर 20 ऑगस्ट 2025 रोजी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिकेच्या व सर्व माध्यमांच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे याची कृपया नोंद घ्यावी, महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.