मुंबई : ड्रायव्हिंग लायसन्ससंदर्भात वाहतूक विभागाने मोठा निर्णय घेतला असून, त्याबाबतचा SMS अनेक नागरिकांच्या मोबाईलवर पोहोचायला सुरुवात झाली आहे. आता ड्रायव्हिंग लायसन्स आणि मोबाईल क्रमांक आधार कार्डाशी लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
School Closed : शाळांना सुट्टी, गाव-खेड्यातल्या शाळांचं काय होणार? मोठी अपडेट समोर!
परिवहन विभागाने या बदलाची माहिती नागरिकांना एसएमएसद्वारे देणे सुरू केले आहे. हा निर्णय केवळ औपचारिक नसून, विविध सेवांना अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि सुलभ बनवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. आधार प्रमाणीकरणामुळे (Aadhaar Authentication) युजर्सची ओळख पडताळली जाईल.
Land Scam : संजय शिरसाटांनी ५ हजार कोटींची जमीन ‘त्या’ कुटुंबाला दिली; रोहित पवारांच्या आरोपाने खळबळ
रिअल-टाइम अपडेट्स मिळणार…
मोबाईल नंबर लिंक केल्यामुळे वाहन नोंदणी, परवाना नूतनीकरण, वाहतूक नियमभंगावर झालेला दंड अशा महत्त्वाच्या अपडेट्स थेट मोबाईलवर मिळतील. यामुळे नागरिक आणि विभाग यांच्यातील संवाद सुधारेल.
पुणे कोथरूड प्रकरण : पोलिसांवर आरोप करणाऱ्या मुलींवरच गुन्हा; नेमकं काय घडलं?
याशिवाय, काही जण चुकीची माहिती देऊन दंड टाळण्याचा किंवा नियमांचे उल्लंघन करून ओळख लपवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, आधार आधारित पडताळणीमुळे हा गैरवापर थांबेल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
पुढील ३ तास धोक्याची, बाहेर फिरणे टाळा, हवामान विभागाचा मोठा इशारा
मोबाईल नंबर कसा अपडेट कराल?
ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करता येणार असून, यासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. नागरिकांना parivahan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन किंवा ‘वाहन’ (Vaahan) आणि ‘सारथी’ (Sarathi) पोर्टलवरून मोबाईल नंबर अपडेट करता येईल.
प्रक्रिया अशी :
अधिकृत पोर्टलवर जा.
“Update Mobile Number via Aadhaar” हा पर्याय निवडा.
वाहन नोंदणी क्रमांक (Vehicle Registration Number) आणि चेसिस/इंजिन क्रमांक (Chassis/Engine Number) भरा.
आधारशी जोडलेल्या मोबाईल नंबरवर आलेला OTP टाकून प्रमाणीकरण पूर्ण करा.