2030 पर्यंत B30 पलीकडील शहरांमधून येणाऱ्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीच्या 1/3 हिस्सा मिळवण्याचे वेल्थ कंपनी म्युच्युअल फंडाचे उद्दिष्ट

मुंबई, 22 जुलै 2025: पँटोमॅथ ग्रुप कंपनी असलेल्या द वेल्थ कंपनी म्युच्युअल फंडाने (वेल्थ कंपनी अ‍ॅसेट मॅनेजमेंट होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेड) 2030 पर्यंत टिअर 2 आणि टिअर 3 शहरांमधील गुंतवणूकदार 45% पर्यंत वाढवण्याचे दीर्घकालीन धोरण आज जाहीर केले. यामुळे देशातील प्रत्येकाला संपत्ती निर्मितीची संधी देण्याची आणि विकसित भारताच्या ध्येयाशी सुसंगत राहण्याची त्यांची वचनबद्धता अधोरेखित झाली आहे. म्युच्युअल फंड ऑपरेशन्स सुरू करण्यासाठी सेबीने अंतिम मंजुरी दिल्यानंतर कंपनीच्या पहिल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे, द वेल्थ कंपनी म्युच्युअल फंड हे भारतातील एकमेव फंड हाऊस आहे ज्याची स्थापना तसेच तिचे नेतृत्व एका महिलेने केले आहे – त्या आहेत मधू लुनावत.

मजबूत संस्थात्मक वारसा आणि वेगळ्या दृष्टिकोनासह वेल्थ कंपनी म्युच्युअल फंड ₹७४.४१ ट्रिलियन म्युच्युअल फंड उद्योगात प्रवेश करतो आहे. ही फर्म सर्वसमावेशक मूलभूत संशोधनातील कठोरपणासह किरकोळ गुंतवणुकीतील साधेपणा एकत्र करेल, यामुळे भारताच्या वाढत्या किरकोळ गुंतवणूकदार बेसमध्ये एक संस्थात्मक शिस्त निर्माण होईल.

महत्त्वाचे म्हणजे, द वेल्थ कंपनी एमएफचा हा उपक्रम पर्यायी गुंतवणूक निधी (एआयएफ), पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवा (पीएमएस) आणि संस्थात्मक सल्लागार आदेशांमध्ये अत्याधुनिक गुंतवणूक उत्पादनांचे व्यवस्थापन करण्याच्या त्यांच्या ट्रॅक रेकॉर्डवर आधारित आहे. याला भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या वित्तीय सेवा कंपन्यांपैकी एक असलेल्या पँटोमॅथ ग्रुपच्या ताकदीचे पाठबळ आहे. ज्यांच्याकडे एक ग्रुप म्हणून ₹10,000 कोटींचे क्लायंट ऍसेट्स आहेत. यातील चार उच्च-कार्यक्षम, थीम-आधारित एआयएफद्वारे क्लायंट मालमत्ता आहेत. नियोजनबद्ध इक्विटी धोरणे, सखोल-बाजार संशोधन आणि प्रशासन-प्रथम अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करत यांनी स्थानिक एचएनआय आणि जागतिक गुंतवणूकदारांना सेवा दिली आहे.

“शिस्तबद्ध गुंतवणूक, संशोधक धोरण आणि भारताच्या आर्थिक इकोसिस्टीमच्या सखोल समजाच्या मजबूत पायावर वेल्थ कंपनी म्युच्युअल फंड उभारण्यात आला आहे,” असे द वेल्थ कंपनी ऍसेट मॅनेजमेंट होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेडच्या संस्थापक, एमडी आणि सीईओ सुश्री मधु लुनावत म्हणाल्या.

“संपूर्ण भारतात, विशेषतः भारतातील मार्केटमध्ये आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणे हे आमचे उद्दिष्ट आहे, जिथे अनेकदा सेवांची कमतरता असते. यासाठीच आम्ही एक धाडसी पण साध्य करता येईल असे ध्येय ठेवले आहे. 2030 पर्यंत टिअर 2 आणि टिअर 3 शहरांमधील गुंतवणूकदार 45% पर्यंत वाढवण्याचे आमचे लक्ष्य आहे. हे केवळ एक ध्येय नाही – तर सर्वसमावेशक गुंतवणुकीसाठी आमची वचनबद्धता आणि विकसित भारत धोरण पुढे नेण्यात आमची भूमिका अधोरेखित करतो. उद्योगातील अनुभवी दिग्गजांच्या नेतृत्व टीमसह, एक मजबूत वितरण धोरण, एआय-संचलित संशोधन आणि आमच्या एमएफ वितरक (एमएफडी) भागीदारांसाठी उच्च-गुणवत्तेचे प्रशिक्षण, आम्ही हे ध्येय पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहोत,” असे सुश्री लुनावत यांनी सांगितले.

वेल्थ कंपनी म्युच्युअल फंडाने उच्च कार्यक्षमता असलेल्या अधिकाऱ्यांचा समावेश आपल्या नेतृत्वात केला आहे. यात श्री. प्रसन्ना पाठक (डेप्युटी सीईओ), सुश्री अपर्णा शंकर (सीआयओ – इक्विटी), श्री. उमेश शर्मा (सीआयओ – कर्ज), आणि श्री. देबाशिष मोहंती (चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर) आणि श्री. भालचंद्र जोशी (सीओओ) यांचा समावेश आहे. या प्रत्येकाकडे त्यांचे असे खास कौशल्य असून यूटीआय, एसबीआय एमएफ, फ्रँकलिन टेम्पलटन, 360 वन आणि निप्पॉन लाईफ यासह अन्य आघाडीच्या संस्थांमध्ये काम करण्याचा दशकांचा अनुभव आहे.

मूडीज सारख्या जागतिक भागीदारांच्या सहकार्याने ही फर्म क्षमता-निर्मिती कार्यक्रमांसह, मजबूत क्षेत्रीय समर्थन आणि वितरकांच्या विकासासह डिजिटली सक्षम, देशव्यापी एमएफडी नेटवर्क तयार करत आहे.