Today’s Horoscope : शनिवार, १९ जुलै २०२५ : “यशासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा!”

By: Editor_Pratik

On: Saturday, July 19, 2025 2:05 AM

rashi final
Google News
Follow Us

Today’s Horoscope

♈ मेष : चंद्र आज आपल्या राशीत आहे, त्यामुळे आत्मविश्वास आणि ऊर्जा भरपूर राहील. प्रत्येक कामात जोश जाणवेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. मित्रमंडळींसोबत वेळ छान जाईल. आईकडून लाभ संभवतो. छोट्या प्रवासाची शक्यता आहे.

♉ वृषभ : चंद्र बाराव्या भावात आहे. मनात नकारात्मक विचार येऊ शकतात. तब्येत थोडी नरम राहील. खर्च वाढेल. घरातील जबाबदाऱ्या त्रासदायक वाटतील. वाद निर्माण होण्याची शक्यता असल्याने वाणीवर नियंत्रण ठेवा.

♊ मिथुन : चंद्र लाभ स्थानात आहे. आर्थिक दृष्ट्या शुभ दिवस. मित्रांकडून मदत व आनंद मिळेल. संततीसंबंधी चांगल्या बातम्या येतील. विवाहेच्छुकांसाठी अनुकूल वेळ. सामाजिक व व्यावसायिक लाभ संभवतो.

♋ कर्क : चंद्र दशम स्थानात असल्यामुळे नवा उत्साह येईल. घरगुती खरेदी कराल. नोकरीत बढती किंवा व्यवसायात यश मिळेल. प्रतिष्ठा वाढेल. सरकारी लाभाची शक्यता. घरात शांतता आणि समाधान नांदेल.

♌ सिंह : भाग्यस्थानातील चंद्र थोडासा आळस आणि थकवा देऊ शकतो. मन बेचैन राहील. यशासाठी विशेष मेहनत घ्यावी लागेल. प्रवास टाळणे योग्य. नकारात्मक विचार दूर ठेवा आणि आत्मविश्वास ठेवा.

♍ कन्या : आज संयमाची गरज आहे. नवीन कामे सुरू करणे टाळा. क्रोध आणि आवेश टाळा. जवळच्या व्यक्तींशी मतभेद संभवतात. प्रवास शक्यतो टाळा. शांत राहणे आणि संयम ठेवणे हितावह ठरेल.

♎ तूळ : संसारिक आनंदाची अनुभूती घ्याल. कुटुंबासोबत बाहेर जाण्याचा बेत होईल. व्यावसायिक क्षेत्रात प्रगती होईल. सामाजिक सन्मान व लोकप्रियता मिळू शकते. वेळ लाभदायक ठरेल.

♏ वृश्चिक : अचानक काही अडचणी उद्भवू शकतात. नियोजित भेटी रद्द होण्याची शक्यता. घरगुती वाद, मतभेद आणि खर्च वाढतील. संयम ठेवा. मन शांत ठेवणे गरजेचे आहे. विशेष काळजी घ्या.

♐ धनु : संततीच्या शिक्षणाबाबत चिंता वाटेल. आरोग्याच्या बाबतीत पचनसंस्थेची तक्रार होऊ शकते. कामात यश मिळवण्यासाठी संयम आवश्यक. प्रेमसंबंध मधुर होतील. लेखन, कला यामध्ये रस वाटेल.

♑ मकर : मनःस्थिती थोडी अस्वस्थ राहील. कौटुंबिक वाद उद्भवतील. आरोग्याकडे लक्ष द्या, छातीत त्रास जाणवू शकतो. कामात अडथळे येतील. अपघाताची शक्यता असल्यामुळे सतर्क राहा.

♒ कुंभ : आजचा दिवस आनंददायक ठरेल. चिंता दूर होतील. भावंडांसोबत सहलीचा बेत आखू शकता. सामाजिक आणि कौटुंबिक आयुष्यात समाधान. विरोधकांवर विजय मिळवू शकाल. सौख्यदायी दिवस.

♓ मीन : खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. रागावर व वाणीवर संयम ठेवा. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. मन थोडं अस्वस्थ राहू शकतं. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

OPPO India

April 27, 2026

OPPO India

April 27, 2026

April 27, 2026

April 27, 2026

Sbi एसबीआय

April 25, 2026

April 24, 2026