पुणे २४ जुलै २०२५ :‘गिफ्ट्स वर्ल्ड एक्स्पो – दिल्ली २०२५’ च्या भव्य उद्घाटन सोहळ्यात पेपरवर्ल्ड इंडिया, कॉर्पोरेट गिफ्ट्स शो आणि गिफ्ट्स वर्ल्ड एक्स्पोच्या आयोजकांनी विलीनीकरणाची अधिकृत घोषणा केली. देशातील उच्च-स्तरीय व्यावसायिक आणि वापर केंद्रांमध्ये मजबूत प्रादेशिक व्यासपीठ उपलब्ध केल्यानंतर आयोजक एक भविष्याचा वेध घेणारे प्रारूप (मॉडेल) सादर करत आहेत.
येत्या फेब्रुवारी २०२६ मध्ये होणाऱ्या गिफ्ट्स वर्ल्ड एक्स्पोच्या मुंबई आवृत्तीत दीर्घकालीन कॉर्पोरेट गिफ्ट्स कार्यक्रमाचा कायापालट होईल. तसेच तो ‘गिफ्ट्स वर्ल्ड एक्स्पो’च्या छत्राखाली पुनर्स्थापित केला जाईल, जेणेकरून कॉर्पोरेट भेटवस्तूंपुरता मर्यादित न राहता भेटवस्तूंची संपूर्ण श्रेणीच यामध्ये उपलब्ध असेल. हे पुनर्ब्रँडिंग भेटवस्तू उद्योगासाठी एक सुसंगत आणि एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करते, जे मागील प्रदर्शनाच्या मजबूत पायावर आणि वारशावर उभारले गेले आहे.
धोरणात्मक भागीदारीबद्दल बोलताना, मेस्से फ्रँकफर्ट एशिया होल्डिंग लिमिटेडचे कार्यकारी संचालक आणि बोर्ड सदस्य श्री. राज मानेक म्हणाले की, एमईएक्स एक्झिबिशन्सबरोबरची आमची निरंतर भागीदारी राष्ट्रीय स्तराशी निगडित आणि क्षेत्रीयदृष्ट्या सखोल ओळख तयार करण्यासाठी आमची ताकद आणि उद्योगातील अंतर्दृष्टी एकत्रित करण्याचे उद्दिष्ट ठेवते. गिफ्ट्स वर्ल्ड एक्स्पो मुंबईत विस्तारत आहे आणि नवी दिल्लीत पेपरवर्ल्ड इंडिया सुरू होत आहे. याद्वारे आम्ही एका मजबूत ब्रँडसह भेटवस्तू आणि लेखनसामग्री विभागांना अधिक प्रभावीपणे ‘बीटूबी’ सेवा देण्यासाठी धोरणात्मकदृष्ट्या सज्ज आहोत.
भारतीय भेटवस्तू बाजारपेठेत उल्लेखनीय वाढ होत आहे. २०२४ मध्ये या बाजारपेठेचे अंदाजित मूल्य ७५.१६ अब्ज डॉलर्स होते, जे २०३० पर्यंत ९२.३२ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, तसेच याचा चक्रवाढ वार्षिक वाढ दर (सीएजीआर) ३.५५ टक्क्यांनी वाढत आहे (रिटेल रिसर्च ट्रेंड्सनुसार).
२०२५ मध्ये (राईटच्या संशोधनानुसार) भारतीय स्टेशनरी उद्योग हे एक गतिमान आणि स्पर्धात्मक क्षेत्र ठरले आहे. पाच वर्षांचा अंदाजित चक्रवाढ वार्षिक वाढ दर (सीएजीआर) ८-१० टक्क्यांसह ज्याचे व्यावसायिक मूल्य सुमारे ३.४९ अब्ज डॉलर इतके आहे. या उद्योगात शैक्षणिक क्षेत्र, कॉर्पोरेट कार्यालये आणि प्रीमियम आणि डिजिटल स्टेशनरीची वाढती मागणी यांचे वर्चस्व आहे. तसेच या क्षेत्रात नोटबुक, रजिस्टर्स आणि कॉपियर पेपर यासारख्या पारंपरिक कागदी उत्पादनांचे वर्चस्व राहिले असले तरी, पर्यावरणपूरक आणि तंत्रज्ञानाने सक्षम लेखन सामग्रीकडेही ग्राहकांचा कल वाढत आहे.