पुणे २४ जुलै २०२५ : शैक्षणिक कंपनी असलेल्या फिजिक्सवालाने (पीडब्ल्यू) पीडब्ल्यूएनएसॅट (फिजिक्सवाला नॅशनल स्कॉलरशिप कम अॅडमिशन टेस्ट) २०२५ च्या चौथ्या आवृत्तीची घोषणा केली. ही एक शिष्यवृत्ती परीक्षा आहे. हा उपक्रम नीट -यूजी आणि आयआयटी- जेईई परीक्षार्थ्यांना आपल्या आर्थिक पार्श्वभूमीची काळजी न करता शिक्षण आणि मार्गदर्शन सुलभ करून मदत करण्याचा प्रयत्न करतो.
पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात या उपक्रमाची घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे पीडब्ल्यू प्रादेशिक प्रमुख, पीडब्ल्यू विद्यापीठ पुणेचे केंद्र प्रमुख आणि व्यवसाय प्रमुख यांनी पीडब्ल्यूएनएसॅट २०२५ चे विविध फायदे स्पष्ट करण्यासाठी एकत्र येऊन हा उपक्रम राबवला. शिवाय, शहरातील अनेक शाळांचे मुख्याध्यापक देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
पीडब्ल्यूएनएसॅट २०२५ परीक्षा ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने घेतली जाईल. त्यातून सर्व प्रदेशातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न केला जाईल. ऑनलाइन पद्धत निवडणारे विद्यार्थी १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०२५ दरम्यान परीक्षेला बसू शकतात. ऑफलाइन पद्धत निवडणाऱ्यांसाठी ही परीक्षा ५ ऑक्टोबर आणि १२ ऑक्टोबर २०२५ रोजी सर्व पीडब्ल्यू विद्यापीठ आणि स्टडी सेंटर्सवर घेतली जाईल. परीक्षेसाठी नोंदणी मोफत आहे आणि सध्या पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच पीसीएम आणि पीसीबी दोन्ही भागांमध्ये बारावी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. तिचा निकाल २५ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर होईल.
फिजिक्सवालाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षक, अलख पांडे म्हणाले, “अनेक विद्यार्थी आपल्या स्वप्नांचा त्याग क्षमता नसल्यामुळे नाही तर आर्थिक अडचणींमुळे करतात. पीडब्ल्यूएनएसॅट २०२५ हा आमचा अशा विद्यार्थ्यांना मदत करण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक मुलाला योग्य संधी मिळायलाच हवी आणि या उपक्रमातून आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत, त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की त्यांची स्वप्ने महत्त्वाची आहेत आणि आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत.”
या परीक्षांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे तसेच १००% शिष्यवृत्ती दिली जाईल. या विद्यार्थ्यांना एका विशेष रँकर्स ग्रुपमध्येही प्रवेश मिळेल. तो त्यांना लक्ष्याधारित आणि धोरणात्मक मार्गदर्शन देण्यासाठी असेल. त्यामुळे त्यांना नीट यूजी आणि आयआयटी-जेईईसारख्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चांगली कामगिरी करण्यास मदत होईल.
