नशिबाची साथ की यशाला आव्हान? जाणून घ्या आजचे राशीभविष्य

मेष (Aries) : आजचा दिवस तुमच्या पाठीशी आहे. कोर्ट-कचेरीचे काम सुटण्याची शक्यता आहे. जोडीदाराची अपेक्षित साथ मिळेल आणि भागीदारी व्यवसायात यश लाभेल. पदोन्नतीसाठी योग्य वेळ आहे. प्रेमसंबंध समाधानी राहतील. कौटुंबिक जबाबदाऱ्या उत्तम पार पडाल.

वृषभ (Taurus) : धनलाभाचे संकेत आहेत. कुटुंबातील सल्ल्याने योग्य निर्णय घ्याल. व्यवसायात कोणत्याही तडजोडीपासून सावध राहा. प्रवास करताना वाहन काळजीपूर्वक चालवा. मुलांकडून समाधानकारक बातमी मिळेल. कामावर लक्ष केंद्रीत ठेवा.

मिथुन (Gemini) : तुमचे निर्णय अचूक ठरतील. संततीचे प्रश्न सुटतील. आत्मविश्वास वाढेल. कामात यश मिळाल्याने आनंददायक क्षण अनुभवाल. व्यवसायात अतिलाभाच्या मागे न लागता स्थिरतेचा विचार करा. वैवाहिक जीवन सुखकारक राहील. आई-वडिलांशी मतभेद होऊ शकतात, संवाद ठेवा.

कर्क (Cancer) : कामानिमित्त प्रवासाचे योग संभवतात. आरोग्य चांगले राहील. मुलांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण करा. तुमच्या कार्याचा गौरव होईल. आज तुमच्या कर्तृत्वाची दखल घेतली जाईल. जवळचे लोक तुमचा आधार बनतील.

सिंह (Leo) : नातेवाईक व कुटुंबीयांची साथ मिळेल. काही महत्त्वाची कामे साहसाने पूर्ण कराल. दिवस व्यस्त जाईल पण फलदायी ठरेल. प्रामाणिकपणा व सचोटी तुमची बलस्थाने ठरतील. मोठ्या व्यवहारांमध्ये यश मिळेल.

कन्या (Virgo) : आर्थिक निर्णय योग्य ठरतील. व्यवसायात नव्या तंत्राचा वापर यश देईल. गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता. घरगुती खरेदीसाठी अनुकूल दिवस. अनावश्यक शंका व टीका टाळा. स्वतःच्या निर्णयांवर भर द्या.

तुळ (Libra) : उत्साहवर्धक घटना घडतील. तुमचा प्रभाव इतरांवर राहील. कौटुंबिक वातावरण सुखद राहील. निर्णय घेताना मन शांत ठेवा, कारण अनेक पर्याय गोंधळ निर्माण करू शकतात.

वृश्चिक (Scorpio) : महत्त्वाच्या वस्तू काळजीपूर्वक सांभाळा. वाहन चालवताना सतर्कता ठेवा. कामातून समाधान मिळेल. चिंता टाळा. जवळच्या लोकांसोबत आनंददायी क्षण घालवाल.

धनु (Sagittarius) : महत्त्वाचे कागदोपत्री व्यवहार पूर्ण होतील. आर्थिक क्षेत्रात धाडसी निर्णय घ्यायला हरकत नाही. मुलांशी अधिक वेळ घालवा. छंद जोपासा. रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा कार्यालयीन अडचणी संभवतात.

मकर (Capricorn) : कार्यस्थळी संधी मिळतील. वरिष्ठांचा पाठिंबा लाभेल. जोडीदाराच्या उत्पन्नात वाढ होईल. घरात तुमच्या कौशल्याची प्रशंसा होईल. चिकाटीने प्रयत्न करत राहा, यश निश्चित आहे.

कुंभ (Aquarius) : महत्त्वाची बातमी मिळण्याची शक्यता. रखडलेली कामे मार्गी लागतील. मनःशांती ठेवणे आवश्यक. प्रेमसंबंध दृढ करण्यासाठी संवाद साधा. नवनवीन कल्पनांना मूर्त स्वरूप द्याल.

मीन (Pisces) : आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतात, प्रवास शक्यतो टाळा. मित्रमंडळींशी सहकार्य घ्या. नवीन कल्पनांची अंमलबजावणी करा. उतावळेपणाने निर्णय घेणे टाळा.