लॉक्स अँड आर्किटेक्चरल सोल्युशन्सने गोदरेज ऍडव्हान्टिस जीएसएल D1 या भारतातील सर्वात सुलभ स्मार्ट डोअर लॉकचे अनावरण केले

मुंबई21 जुलै 2025 – गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या अखत्यारीतील आणि गृह सुरक्षा तसेच आर्किटेक्चरल सोल्युशन्समधील आघाडीची कंपनीलॉक्स अँड आर्किटेक्चरल सोल्युशन्सने आज त्यांच्या नवीन हाय-टेक अशा ऍडव्हान्टिस जीएसएल D1 या स्मार्ट डोअर लॉकचे संपूर्ण भारतात लाँच करण्याची घोषणा केली. भारतात डिझाइन केलेले आणि बनवलेलेपण जगासाठी तयार करण्यात आलेले ऍडव्हान्टिस जीएसएल D1 म्हणजे आधुनिक गृह सुरक्षेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. यात अत्याधुनिक स्मार्ट ऍक्सेस तंत्रज्ञान आणि ऍक्सेसिबिलिटीसह सौंदर्यात्मक अभिजाततेचे मिश्रण दिसते.  

आधुनिक घरांसाठी तयार करण्यात आलेले आणि भारतातील सर्वात प्रगत डिजिटल लॉक अशी ओळख असलेल्या GSL D1 ची किंमत 18,499/- पासून सुरू होते. शहरी जीवनशैलीच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे डिझाइन करण्यात आले आहे. बहुस्तरीय डिजिटल संरक्षणासोबतच यात उत्कृष्ट असे डिझाइन आणि सोय एकत्रितरित्या आहे.

गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या लॉक्स आणि आर्किटेक्चरल सोल्युशन्सचे बिझनेस हेड श्री. श्याम मोटवानी म्हणाले, “अ‍ॅडव्हान्टिस जीएसएल डीच्या माध्यमातून आधुनिक घराची सुरक्षितता कशी दिसते हे आम्ही पुन्हा परिभाषित करत आहोत. हे केवळ तुमचे घर सुरक्षित ठेवण्याबद्दल नाही, तर ते स्टाईल, हुशारी आणि साधेपणाने उपलब्ध करण्याबद्दलही आहे. भारतीय बाजारपेठेसाठी हे लाँच अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण स्मार्ट होम सेफ्टी सोल्युशन्समध्ये ही एक महत्त्वपूर्ण झेप आहे कारण यामुळे ‘मेक इन इंडिया, फॉर द वर्ल्ड’ या आमच्या वचनबद्धतेला बळकटी मिळते.”

GSL D1 चा फायदा सांगणारी प्रमुख वैशिष्ट्ये:

  • मोबाइल NFC: चावी किंवा कार्डशिवाय प्रवेश
  • वाय-फाय द्वारे रिमोट ऑपरेशन: जगात कुठूनही तुमचा दरवाजा अनलॉक करा आणि हालचालींवर लक्ष ठेवा.
  • मोबाइल ब्लूटूथ: गोदरेज स्मार्ट लॉक्स ऍप वापरून ब्लूटूथद्वारे दरवाजा ऍक्सेस करा.
  • बायोमेट्रिक सुरक्षा: संरक्षणासाठी फिंगरप्रिंट-आधारित प्रवेशाची सोय.
  • पिन कोड प्रवेश: स्क्रॅम्बल्ड कोड वापरून क्लिष्ट, गुंतागुंतीचा पासवर्ड तयार करा.
  • RFID कार्ड: डुप्लिकेशन टाळण्यासाठी आणि अतिरिक्त सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी एन्क्रिप्टेड प्रवेश कार्ड. वापरण्यास सोपे, कुटुंबातील वृद्ध सदस्यांसाठी अत्यंत योग्य पर्याय.
  • मेकॅनिकल की ओव्हरराइड: EXS तंत्रज्ञानाचा वापर करून उच्च दर्जाचे मेकॅनिकल फॉलबॅक.
  • VDP एकत्रीकरण: अतिरिक्त सोयीसाठी व्हिडिओ डोअर फोनची सोय.

आता रोझ गोल्ड आणि ब्लॅक अशा दोन आकर्षक फिनिशमध्ये हे उपलब्ध आहे. GSL D1 मध्ये इमर्जन्सी टाइप-सी यूएसबी चार्जिंगमोफत इन्स्टॉलेशन आणि वर्षांची वॉरंटी देखील आहे.

गुजरातमधील 350+ मल्टी-ब्रँड होम इम्प्रुव्हमेंट स्टोअर्समध्ये ऍडव्हान्टिस जीएसएल डी1 उपलब्ध असेल. यासोबतच प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाल्याने महानगरातील लोकांपर्यंत हे लॉक जलद पोहोचेल.

कंपनीच्या व्यापक  दृष्टिकोनाचा एक भाग म्हणूनलॉक्स अँड आर्किटेक्चरल सोल्युशन्स घराची रचना तसेच सुरक्षिततेच्या क्षेत्रात सतत काही न काहीतरी नवीन आणण्याच्या प्रयत्नात असतात. बुद्धिमान स्मार्ट होम सोल्यूशन्सना एका सुंदर डिझाइनची जोड देतात. काळानुरूप बदल होत असलेल्या भारतीय घरांसाठी सुरक्षितस्टायलिश आणि स्मार्ट ऍक्सेस सोल्यूशन्स देण्याच्या आपल्या वचनाचा कंपनी GSL D1 च्या माध्यमातून पुनरुच्चार करते.