पुणे : कोंढवा बुद्रुक येथील श्रीपार्श्वनगर सोसायटीमध्ये राहणाऱ्या ७४ वर्षीय लीला राठोड या दिनांक २० जुलै रोजी संध्याकाळी ८:३९ वाजता बेपत्ता झाल्या असून, त्यांच्या कुटुंबीयांनी व महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुपचे प्रमुख शिवाभाऊ पासलकर यांनी नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, लीला राठोड या संध्याकाळच्या सुमारास गोकुळ हॉटेल, शांतीनगर, कोंढवा येथून बाहेर पडल्या होत्या. त्या वेळेस त्या कात्रज घाटाच्या दिशेने जाताना दिसल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. मात्र, त्यानंतर त्या कुठेही आढळून आलेल्या नाहीत.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर मिसिंग ग्रुपचे शिवाभाऊ पासलकर यांच्या उपस्थितीत राठोड कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती दिली. लीला राठोड यांचा मुलगा, मुलगी, मावस भाऊ आदींनी भावनिक शब्दांत नागरिकांना मदतीचे आवाहन केले. “आई गेल्या काही वर्षांपासून थोडी विस्मरणशक्तीच्या त्रासाने ग्रस्त होत्या. त्या घरीच राहत होत्या, मात्र त्या दिवशी अचानक बाहेर पडल्यावर परत आल्या नाहीत,” असे राठोड कुटुंबीयांनी सांगितले.
शोधकार्य सुरू असून, लीला राठोड या कोठेही आढळून आल्यास 9422345705, 9860053639, 9420212155 या मोबाईल नंबरवर तातडीने संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे:
शिवाभाऊ पासलकर यांनी सांगितले की, “मिसिंग झालेल्या व्यक्तीच्या बाबतीत सुरुवातीचे काही तास अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यामुळे नागरिकांनी जर कोठेही लीला राठोड यांना पाहिले असल्यास त्वरित 9422345705 या क्रमांकांवर संपर्क करावा.”
कोंढवा, कात्रज आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे कामही सुरू असून पोलिसांना या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. नागरिकांना विनंती आहे की अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीच पुढे पाठवावी आणि शोधकार्याला मदत करावी.