रांजणगाव-ओझर अष्टविनायक महामार्गावर दुर्दैवी अपघात; सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू

By: Editor_Manas

On: Sunday, June 22, 2025 3:18 PM

Google News
Follow Us

पोंदेवाडी (ता. आंबेगाव) :
रांजणगाव ओझर अष्टविनायक महामार्गावर रविवारी (२२ जून) दुपारी झालेल्या दुर्दैवी अपघातात सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. शिवराज सुनील रोडे (वय ६), रा. रोडेवाडी, पोंदेवाडी हा मुलगा रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या इको वाहनाने त्याला धडक दिली.

ही घटना रोडेवाडी फाट्याजवळ दुपारी तीनच्या सुमारास घडली. धडकेनंतर शिवराज गंभीर जखमी झाला होता. तातडीने त्याला मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

या घटनेने पोंदेवाडी परिसरात शोककळा पसरली असून, पोलिसांनी संबंधित वाहनचालकाविरोधात आवश्यक कारवाई सुरू केली आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News