Raja Raghuvanshi Murder : इंदौरचा व्यावसायिक राजा रघुवंशीच्या मर्डरचं रहस्य अजूनच गडद होत आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी पोलिसांनी पकडले आहेत. तरीही या हत्याकांडाचं रहस्य अजूनही कायम आहे. कारण या प्रकरणात रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत.
आता राजाची बायको सोनम आणि तिचा बॉयफ्रेंडबाबतचं नवं रहस्य समोर आलं आहे. मेघालय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजाच्या हत्येनंतर सोनम आणि तिचा बॉयफ्रेंड एका महिलेची हत्या करणार होते. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी एका महिलेची हत्या करण्याचा या दोघांचा प्लान होता. म्हणजे या महिलेची हत्या करून तिचा मृतदेह जाळून टाकायचा होता. म्हणजे राजासोबतच सोनमचाही मृत्यू झालाय असं पोलिसांना वाटलं पाहिजे, असा प्लानच या दोघांनी केला होता. या धक्कादायक माहितीमुळे मेघालय पोलीसही चक्रावले.
सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाह या हत्येचा मास्टरमाइंड होता. सोनम त्याला प्रत्येक षडयंत्रात साथ देत होती. सोनमची चौकशी करण्याच्या पहिल्या दिवशी तिचा बॉयफ्रेंड राज आणि अन्य तिघांनी एक खुलासा केला होता. सोनम बुरखा घालून मेघालयातून पळून गेली होती. टॅक्सी, बस आणि ट्रेन सारख्या विविध माध्यमातून ती मध्यप्रदेशातील इंदौरमध्ये आली होती, अशी धक्कादायक माहिती या तिघांनी दिली.
राज आणि सोनमने 11 मे रोजी राजाची मेघालयात हत्या करण्याचं षडयंत्र रचलं होतं. राजने प्लान रचला होता. तर सोनमने त्याला साथ दिली होती. अन्य तीन आरोपी राजचे मित्र होते. हे प्रकरण हत्येची सुपारी देण्याचं नाही. पण प्लान करूनच हत्या करण्यात आली होती. सोनमने तिचा मित्र राजची मदत घेऊनच हा कट पूर्ण केला, अशी माहिती पोलीस अधीक्षक विवेक सायम यांनी दिली.
राजने खर्चासाठी 50 हजार रुपये दिले होते. राजाला मारण्यासाठी दोन प्लान तयार करण्यात आले होते. पहिल्या प्लाननुसार सेल्फी घेत असताना राजाला कड्यावरून ढकलून देऊन मारणं. हा प्लान फेल गेला तर प्लान बी पार पाडायचा होता. म्हणजे आधी राजाला मारून टाकायचं. त्यानंतर त्याला उंच दरीतून फेकायचं. पण पहिला प्लान फेल गेल्याने आरोपींनी दुसरा प्लानने त्याला मारलं, असं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं.
दरम्यान, राजाला मारल्यानंतर एखाद्या महिलेची हत्या करून तिला जाळून टाकण्याचाही सोनम आणि राजचा प्लान होता. म्हणजे राजासोबत सोनमचाही मृत्यू झाल्याचं भासवायचं होतं. त्यानंतर सोनम गायब होणार होती, अशी माहितीही समोर येत आहे.