Big Breaking News : जेजुरी-मोरगाव रस्त्यावर भीषण अपघात : आठ ठार, पाच गंभीर जखमी

By: Editor_Pratik

On: Wednesday, June 18, 2025 4:51 PM

Google News
Follow Us

Big Breaking News : जेजुरी-मोरगाव रस्त्यावर भीषण अपघात : आठ ठार, पाच गंभीर जखमी

जेजुरी, दि. १८ जून | प्रतिनिधी

जेजुरी-मोरगाव रस्त्यावरील किर्लोस्कर कंपनीजवळील श्रीराम ढाब्यासमोर मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका महिलेसह आठ जणांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

स्वीफ्ट डिझायर कार (क्र. MH-42-AX-1060) पुण्याहून मोरगावकडे जात असताना श्रीराम ढाब्यासमोर साहित्य खाली करत असलेल्या पिकअप टेम्पो (क्र. MH-12-XM-3694) ला जबर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की टेम्पोच्या शेजारी उभ्या असलेल्या दुसऱ्या कारलाही (क्र. MH-12-TK-9483) ती कार धडकली.

या अपघातात टेम्पोमधील साहित्य खाली करत असलेले दोघेजण, ढाब्यासमोर उभे असलेले तिघे आणि स्वीफ्ट कारमधील तिघे – असे एकूण आठ जण जागीच मृत्युमुखी पडले. अपघातात दोन लहान मुले, एक महिला आणि दोन पुरुष गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे:

  • सोमनाथ रामचंद्र वायसे (रा. नाझरे कप, ता. पुरंदर)

  • रामू संजीवन यादव (रा. नाझरे कप, ता. पुरंदर)

  • अजय कुमार चव्हाण (रा. उत्तर प्रदेश)

  • अजित अशोक जाधव (रा. कांजळे, ता. भोर, जि. पुणे)

  • किरण भारत राऊत (रा. पवारवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे)

  • अक्षय शंकर राऊत (रा. झारगडवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे)

  • अश्विनी शंकर ऐसार (रा. नागनसूर हेन्द्रे, जि. सोलापूर)

  • एक अनोळखी पुरुष – ओळख पटलेली नाही

जखमींची नावे अपघाताच्या वेळी उपलब्ध झाली नसून त्यांचा तपशील अद्याप प्रतीक्षेत आहे.

अपघातानंतर काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी अधिक तपास पोलीस करत आहेत.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

July 17, 2026

Trupti Desai

July 15, 2026

July 14, 2026

July 13, 2026

July 13, 2026

July 12, 2026