‘या’ तारखांना पडणार मुसळधार पाऊस – हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज

महाराष्ट्रात पावसाची पुनरागमनाची तयारी सुरु झाली आहे. मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी असला, तरी लवकरच राज्यात मुसळधार पावसाचे आगमन होणार आहे, असा अंदाज प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.

राज्यात 7 जून ते 10 जून दरम्यान काही भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर 13 जून ते 18 जून या काळात अतिवृष्टीसारखा पाऊस पडणार असून, वडे-नाले वाहतील असा जोरदार पाऊस अनेक भागांत होईल, असा इशाराही डख यांनी दिला आहे.

या पावसामुळे जमिनीत भरपूर ओल निर्माण झाली असून, पेरणीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. डख यांच्यानुसार, जूनच्या अखेरपर्यंत राज्यातील सर्व शेतकरी पेरणी पूर्ण करू शकतील. तरीही, प्रत्येक शेतकऱ्याने आपापल्या शेतातील परिस्थितीनुसार पेरणीचा निर्णय घ्यावा.

कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

  • 13 जून ते 18 जून दरम्यान खालील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता वर्तवली आहे:
  • पश्चिम महाराष्ट्र: मुंबई, पुणे, नाशिक, नगर, संगमनेर
  • मराठवाडा: लातूर, नांदेड, बीड, धाराशीव, सोलापूर
  • पश्चिम घाट व दक्षिण महाराष्ट्र: सातारा, सांगली, कोल्हापूर
  • उत्तर महाराष्ट्र: धुळे, नंदुरबार, जळगाव
  • विदर्भ: अमरावती, अकोला, बुलढाणा, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली

पेरणीपूर्व तयारी सुरू ठेवा : डख यांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे की, 7 ते 12 जून दरम्यान शेतीची तयारी पूर्ण करून ठेवावी, जेणेकरून 13 तारखेपासून सुरू होणाऱ्या मुसळधार पावसाचा फायदा घेता येईल.